IPL 2025 RR vs RCB 28th Match Player to Watch Devdutt Padikkal Royal Challengers Bengaluru : आयपीएलच्या १८ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ कमालीची कामगिरी करताना दिसतोय. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील संघ एकदम संतुलित आहे. पण मध्यफळीतील स्टार खेळाडू कधी लयीत येणार? हा एक मोठा प्रश्नच आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात 'अनसोल्ड' राहिलेल्या ज्या खेळाडूवर बोलू लावत RCB नं त्याला किंमत दिली तो देवदत्त पडिक्कल धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. सध्याच्या घडीला त्याचा फ्लॉप शो हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी चिंतेचा विषय ठरतोय. तो आगामी सामन्यात तरी हिंमत दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
RCB च्या ताफ्यातून IPL मध्ये धमाकेदार पदार्पण, किंमत वाढली अन् कामगिरीचा आलेख घसरला
डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारा देवदत्त पडिक्कल हा एक प्रतिभावंत खेळाडू आहे. कर्नाटकच्या या बॅटरनं २०२० च्या हंगामात आरसीबीकडून अगदी धमाक्यात पदार्पण केले होते. ४७३ धावा करत त्याने आयपीएल स्पर्धा गाजवली. २०२१ च्या हंगामातही त्याने RCB कडून एका अर्धशतकासह एका शतकाच्या मदतीने ४११ धावा केल्या. २०१९ ते २०२१ च्या हंगामापर्यंत तो २० लाख या मूळ किंमतीसह बंगळुरु संघाचा भाग राहिला. त्यानंतर तो ७.७५ कोटी रुपयांसह राजस्थान रॉयल्सच्या संघानं त्याला आपल्या ताफ्यात घेतले. गत हंगामात तो याच रक्कमेसह लखनौच्या संघातून खेळताना दिसला. पण किंमत वाढल्यावर त्याच्या कामगिरीचा आलेख घसरल्याचे पाहायला मिळाले.
IPL 2025 : व्हॉट्सअॅप DP ला धोनीचा फोटो; मनी 'ध्रुव' ताऱ्यासारखं चमकण्याचं स्वप्न
बॅटिंगमधील धमक दाखवताना गंभीर, धोनीसह रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडलाय
२०२१ च्या हंगामात आयपीएलमधील पहिले शतक झळकावताना त्याने खास विक्रमही आपल्या नावे केला होता. आयपीएलमध्ये सर्वात जलदगतीने १००० धावांचा पल्ला गाठणारा तो तिसरा भारतीय फलंदाज आहे. २०२१ च्या हंगामात त्याने गौतम गंभीर, महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्माला मागे टाकत ही विक्रमी कामगिरी नोंदवली होती.
आयपीएलआधी वनडेत शतक ठोकलं, पण...
देवदत्त पडिक्कल हा बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघासोबत होता. हा दौरा बाकावर बसून काढल्यावर देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानात उतरताना त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत शतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते. आयपीएल आधी त्याच्या भात्यातून आलेली खेळी RCB च्या संघानं जुन्या भिडूवर पुन्हा खेळलेला डाव एकमद योग्य असल्याचे संकेत देणारी होती. आता तो डाव फसताना दिसतोय. यंदाच्या हंगामातील पहिल्या पाच सामन्यात ३७ ही त्याची सर्वोच्च धावंसख्या आहे. टी-२० मध्ये कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या महाराजा टी-२०- लीगमध्ये त्याने अखेरचे अर्धशतक झळकावले होते. २७ ऑगस्ट २०२४ रोजी त्याच्या भात्यातून ३५ चेंडूत ५० धावांची खेळी पाहायला मिळाली होती. देवदत्त पडिक्कल याच्यात मोठी खेळी करून सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. हिंमत दाखवत आपल्यातील क्षमता सिद्ध करण्याचे चॅलेंज त्याच्यासमोर आहे.
Web Title: IPL 2025 RR vs RCB 28th Match Lokmat Player to Watch Devdutt Padikkal Royal Challengers Bengaluru
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.