IPL 2025 RR vs RCB 28th Match Player to Watch Dhruv Jurel Rajasthan Royals : क्रिकेटच्या मैदानात लक्षवेधी कामगिरीसह आपली खास छाप सोडणाऱ्या चेहऱ्यांपैकी एक असलेला चेहरा म्हणजे ध्रुव जुरेल. हा विकेट किपर बॅटर राजस्थान रॉयल्सच्या संघातील तो एक प्रमुख खेळाडू आहे. २०२२ पासून तो या संघाकडून खेळताना दिसते. यंदाच्या हंगामातही त्याच्याकडून दिमाखदार संघाला दिमाखदार कामगिरीची अपेक्षा असेल. जाणून घेऊयात रॉयल्सच्या ताफ्यातील रॉयल कामगिरी करण्याची धमक असलेल्या स्टार खेळाडूसंदर्भातील खास गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धोनीशी तुलना झाली अन् तो राजस्थानचा रॉयल खेळाडूही झाला
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधीत्व करणारा ध्रुव जुरेल हा उजव्या हाताचा फलंदाज आणि यष्टीरक्षक आहे. उत्तुंग फटकेबाजी करण्याची क्षमता आणि यष्टीमागे चपळ कामगिरीसह लक्षवेधत त्याने मागील वर्षी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. भारतीय संघाकडून कसोटी खेळताना त्याने धमकही दाखवली. लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी या युवा विकेट किपर बॅटरची तुलना महेंद्रसिंह धोनीशी केली अन् मग राजस्थानच्या संघानेही त्याला आपल्या ताफ्यातील रॉयल खेळाडूचा दर्जा दिल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीच्या तीन हंगामात २० लाख रुपयांच्या पॅकेजसह खेळणाऱ्या या २४ वर्षीय खेळाडूसाठी २०२५ च्या हंगामासाठी राजस्थानच्या संघाने १४ कोटी मोजले आहेत.
Abhishek Sharma Record : वादळी शतकी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला KL राहुलचा विक्रम
धोनीला आदर्श मान जपतोय 'ध्रुव' ताऱ्यासारखं चमकण्याचं स्वप्न भारताचा यशस्वी कर्णधार आणि विकेट किपर बॅटर महेंद्रसिंह धोनीशी तुलना होणं ही काही छोटी गोष्ट नाही. यावर प्रतिक्रिया देताना ध्रुव जुरेल याने मनातली गोष्ट बोलूनही दाखवली होती. तो म्हणाला होता की, धोनी हाच माझा आदर्श आहे. माही भाईसारखं कोणीच होऊ शकत नाही. मला माझी ओळख निर्माण करायची आहे. त्याचा हा निर्धार आकाशातील ध्रुव ताऱ्याप्रमाणे आपलं वेगळेपण जपत स्वत:च अस्तित्व सिद्ध करून क्रिकेटच्या मैदानात चमकण्याचा आहे, असाच आहे.
व्हॉट्सअॅप DP ला धोनीचा फोटो, या फ्रेममध्ये दडलाय फटकेबाजीचा मंत्र
ध्रुव जेरेल याने आपल्या व्हॉट्सअॅप DP वर धोनीसोबतचा फोटो सेट केल्याची गोष्टही चर्चेचा विषय ठरली होती. या फोटोमध्ये तो धोनीकडून खास टिप्स घेताना पाहायला मिळाले होते. प्रॅक्टिसमध्ये पहिल्या चेंडूपासून हिट करत जा, असा सल्ला धोनीने दिल्याची गोष्टही त्याने शेअर केली होती. मैदानात उतरल्यावर तो हा मंत्र जपतानाही दिसते.
ध्रुव जुरेलची आयपीएलमधील कामगिरी.
ध्रुव जुरेल याने आतापर्यंत आयपीएलमध्ये राजस्थान संघाकडून ३३ सामने खेळले आहेत. ३ अर्धशतकासह त्याच्या खात्यात ४७१ धावा जमा आहेत. ७० ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या असून या धावा त्याने यंदाच्या हंगामातच केल्या आहेत. यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात मोठ्या धावसंख्याचा पाठलाग करताना त्याने ३५ चेंडूत ७० धावांची खेळी केली होती. ही खेळी त्याच्यातील बिग हिटरची क्षमता दाखवणारी होती.