IPL 2025 : सर्फराज खानसह त्याचा धाकटा भाऊही मेगा लिलावात करु शकतो विक्रमी कमाई

अनेक फ्रँचायझी संघ प्रमुख खेळाडूंना रिलीज करून मेगा लिलावात नवी संघ बांधणी करण्यावर भर देतील, अशी चर्चा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 06:12 PM2024-10-29T18:12:18+5:302024-10-29T18:27:05+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 sarfaraz khan and brother musheer khan could get big amount indian premier league 2025 mega auction | IPL 2025 : सर्फराज खानसह त्याचा धाकटा भाऊही मेगा लिलावात करु शकतो विक्रमी कमाई

IPL 2025 : सर्फराज खानसह त्याचा धाकटा भाऊही मेगा लिलावात करु शकतो विक्रमी कमाई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sarfaraz Khan and Musheer Khan, IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या हंगामासाठी संघ बांधणी करण्यासाठी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. याआधी आयपीएलमधील १० फ्रँचायझी संघ ३१ ऑक्टोबरपर्यंत रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सुपूर्द करतील. अनेक फ्रँचायझी संघ प्रमुख खेळाडूंना रिलीज करून मेगा लिलावात नवी संघ बांधणी करण्यावर भर देतील, अशी चर्चा आहे. या परिस्थितीत उद्योन्मुख खेळाडूंवरही पैशांची बरसात होताना दिसेल. यात सर्फराज खानसह त्याचा भाऊ मुशीर खानवरही फ्रँचायझी संघाच्या नजरा असतील.

डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या त्याच्या खेळीनं उघडले असतील फ्रँचायझी संघातील मंडळींचे डोळे

सर्फराज खान याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धमाकेदार कामगिरी करून दाखवत टीम इंडियात एन्ट्री मारली आहे. भारतीय संघाकडून खेळतानाही त्याने आपल्या खास अंदाजाची झलक दाखवून दिलीये. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने १५० धावांची जबरदस्त खेळी केली होती. त्याची फटकेबाजी चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी तर होतीच. पण फ्रँचायझी संघातील मंडळींचे डोळेही त्या खेळीनं निश्तिच उघडले असतील.  

सर्फराज आतापर्यंत ३ फ्रँचायझीकडून खेळलाय ५० IPL सामने 

सर्फराज खान याने २०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून आयपीएल पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने ३ फ्रँचायझी संघाचे प्रतिनिधीत्व करताना ५० सामन्यात २२.५० च्या सरासरीनं ५८५ धावा केल्या आहेत.  यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. २०२४ मध्ये तो आयपीएलच्या कोणत्याही संघाचा भाग नव्हता. पण आगामी हंगामात त्याच्यावर मोठी बोली लागेल, अशी अपेक्षा आहे.

मुशीर खान पदार्पणात करु शकतो मोठा धमाका

सर्फराजशिवाय त्याचा भाऊ मुशीर खान हा देखील आगामी मेगा लिलावात लक्षवेधी चेहरा ठरू शकतो. मुशीर खान याने आतापर्यंत ९ प्रथम श्रेणी सामन्यात ५१,१४ च्या सरासरीनं ७१६ धावा केल्या आहेत. ज्यात ३ शतकासह एका अर्धशतकाचा समावेश आहे. देशांतर्गत स्पर्धेत आपल्यातील क्षमता सिद्ध करुन त्यानेही क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सर्फराजशिवाय त्याच्यावरही आयपीएलच्या आगामी मेगा लिलावात मोठी बोली लागू शकते. 

Web Title: IPL 2025 sarfaraz khan and brother musheer khan could get big amount indian premier league 2025 mega auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.