CSK Never Chase A Target Of More Than 180 Runs Without Suresh Raina : चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) संघावर राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात सलग दुसऱ्या पराभवाची नामुष्की ओढावली. राजस्थानच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईच्या संघासमोर १८३ धावांचे टार्गेट दिले होते. राजस्थानच्या संघानं धावफलकावर१८० धावा लावल्यावरच चेन्नईवर मानसिक दबाव निर्माण झाला होता. आता तुम्ही म्हणाल ही काय भानगड? तर यामागची स्टोरी अशी आहे की, याआधीच्या ८ सामन्यात १८० धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जच्या पदरी निराशा आली होती. ज्याची भीती होती तेच झालं अन् १८० धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जचा संघ पुन्हा कमी पडला. गुवाहटीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाला ६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धोनी-जडेजा मैदानात असताना हातून निटला सामना
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड अर्धशतकी खेळी केल्यावर महेंद्रसिंह धोनी मैदानात उतरला. धोनी मैदानात आला त्यावेळी संघाला विजयासाठी अखेरच्या ३ षटकात ४५ धावांची गरज होती. सर्वोत्तम फिनिशरचा टॅग लागलेल्या धोनीच्या साथीला जडेजाही होता. या दोघांना १८ व्या षटकात मोठी फटकेबाजी करता आली नाही. याआधी जो महिश तीक्षणा (Maheesh Theekshana) चेन्नईच्या ताफ्यातून खेळताना दिसला त्याने CSK च्या हिट जोडीला फक्त ६ धावा दिल्या. त्यामुळे धावांचा पाठलाग करताना संघावरील दबाव वाढला. धोनी ११ चेंडूत १६ धावा करून तंबूत परतला अन् उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आल्या.
IPL: विराट कोहलीच्या RCB चा जलवा! MS Dhoni च्या CSK ला मैदानात तर हरवलंच पण...
"ये रन चेज है मुश्किल", CSK च्या नावे लाजिरवाणा विक्रम
चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएलमधील पाचवेळचा चॅम्पिनय संघ आहे. पण या संघाचा एक रेकॉर्ड भुवया उंचावणारा आहे. १८० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना नवव्यांदा CSK वर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल याआधी २०१८ च्या हंगामात चेन्नईच्या संघानं १८० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकला होता.
सुरेश रैना नाही तेव्हापासून CSK च्या पदरी भोपळाच
याआधी चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने १८० धावांचा पाठलाग केला त्यावेळी चिन्ना थाला सुरेश रैना संघाचा भाग होता. त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यापासून ज्या ज्या वेळी CSK वर १८० धावांचा पाठलाग करण्याची वेळ आली त्या त्यावेळी संघाच्या पदरी पराभव आला. रैनाशिवाय खेळताना CSK च्या पदरी ९ वेळा भोपळा पदरी पडला आहे. हा आकडा संघाची चिंता वाढवणारा आहे. शिवम दुबे हा रैनाची परफेक्ट रिप्लेसमेंट आहे. उर्वरित सामन्यात ही वेळ टाळायची मोठी जबाबदारी त्याने घेतली तर निश्चितच यातून संघ सावरू शकेल.
Web Title: IPL 2025 Shameful Record Chennai Super Kings Never Chase A Target Of More Than 180 Runs In IPL Without Suresh Raina
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.