Join us

Virat Kohli, IPL 2025: RCB ला हरवल्यावर Shubman Gill ने विराट कोहलीला मारला टोमणा? ७ शब्दांची पोस्ट व्हायरल

Shubman Gill Virat Kohli, IPL 2025 RCB vs GT: बेंगळुरूला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवल्यानंतर गुजरातचा कर्णधार शुबमन गिल याने एक पोस्ट केली.

By विराज भागवत | Updated: April 3, 2025 11:23 IST

Open in App

Shubman Gill, Virat Kohli, IPL 2025 RCB vs GT: विराट कोहलीच्या बेंगळुरू संघाने सलामीचे दोन सामने जिंकल्यानंतर त्यांना बुधवारच्या सामन्यात हंगामातील पहिल्या पराभवाचे तोंड पाहावे लागले. शुबमन गिलच्या गुजरात टायटन्स संघाने RCB ला ८ गडी आणि १३ चेंडू राखून पराभूत केले. गुजरातचा मोहम्मद सिराज ३ बळी घेत सामनावीर ठरला. जोस बटलरनेही गुजरातकडून खेळताना नाबाद ७३ धावा केल्या. सामन्यात विराट कोहलीने केवळ ७ धावा केल्या. तर शुबमन गिलने १४ धावा काढल्या. दोघेही फ्लॉप ठरले असले तरीही गुजरातने बेंगळुरूला पराभूत केले. या विजयानंतर गिलने विजयाची पोस्ट करत विराट कोहलीला टोला लगावला असे बोलले जात आहे.

गिलने ट्विट करत काय लिहिले?

बेंगळुरूला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवल्यानंतर गुजरातच्या खेळाडूंनी जल्लोष केला. मैदानातील सामना संपल्यानंतर गुजरातचा कर्णधार शुबमन गिल याने एक पोस्ट केली. ट्विटरवर त्याने अवघ्या सात शब्दांची पोस्ट केली. त्याने लिहिले की, Eyes on the game, not the noise. याचा अर्थ आमचे लक्ष केवळ खेळावर होते, आजुबाजूला सुरु असलेल्या गोंगाटाकडे आम्ही लक्ष देत नव्हतो. या पोस्टच्या आडून शुबमन गिलने त्याचा अनुभवी सहकारी विराट कोहलीला टोमणा लगावल्याची चर्चा सुरु आहे. विराट कोहली हा अतिशय आक्रमक खेळाडू आहे. मैदानावर असताना तो अतिशय सक्रीय असतो. प्रतिस्पर्धी संघाचा एखादा खेळाडू बाद झाल्यावर तो अतिशय आक्रमकपणे सेलिब्रेशनही करतो. केवळ टीम इंडियाकडून खेळतानाच नव्हे तर RCB मधून खेळत असतानाही विराट आपला आक्रमकपणा कायम ठेवतो. त्यामुळे त्याच्याविरूद्ध खेळणे म्हणजे एकप्रकारचा गोंगाट असू शकतो असे शुबमन गिलला म्हणायचे आहे का, असा सवाल विचारला जात आहे.

आणखीही एक अर्थ...

याशिवाय शुबमन गिलच्या पोस्ट आणखीही एक अर्थ काढता येऊ शकतो. गुजरातचा संघ RCB विरूद्ध चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळत होता. हे विराटच्या बेंगळुरू संघाचे घरचे मैदान आहे. साहजिकच या सामन्यासाठी आलेले बहुतांश प्रेक्षक हे RCB चे सपोर्टर असणार. त्यामुळे स्टेडियममध्ये त्यांचा गोंधळ खूप जास्त असणार. त्यामुळे 'आम्ही गोंगाटावर नव्हे तर खेळावर लक्ष दिले' असे गिल म्हणाला असू शकतो.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५विराट कोहलीशुभमन गिलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरगुजरात टायटन्सट्विटर