IPL 2025 SRH MI Stars Observe One Minute Silence To Honour Pahalgam Attack Victims : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ४१ वा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यावेळी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसह पंच काळी फित बांधून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि या हल्ल्यात नाहक बळी ठरलेल्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होण्याच्या हेतूने बीसीसीआयने हे पाउल उचलले होते. सामन्याला सुरुवात होण्याआधी नाणेफेक झाल्यावर दोन्ही संघातील खेळाडू आणि पंचांसह सामनाधिकाऱ्यांनी दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या पर्यटकांना एका मिनिटांचे मौन पाळत श्रद्धांजली देखील वाहिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशातील सामान्य माणसांपासून ते वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींकडून या घटनेचा निषेध करून या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या स्टार क्रिकेटर्संनही या हल्ल्याचा निषेध करताना दहशतवाद्यांची गय करू नये, अशी मागणी केल्याचे पाहायला मिळाले, होते. जो तो आपापल्या परिने या घटनेशी कनेक्ट होत असताना बीसीसीआयने या घटनेच्या पार्श्वभूमीवर जल्लोष आणि आतषबाजीशिवाय सामना खेळवण्याचा निर्णयही घेतल्याचे पाहायला मिळाले.