Join us

IPL 2025 SRH vs GT : स्फोटक फलंदाज ठरले 'फुसका बार'; काव्या मारनला आला राग (VIDEO)

संघ मालकीण काव्या मारनला ही गोष्ट खटकली अन् ती चिडल्याचेही पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 21:12 IST

Open in App

Kavya Maran Angry Expression Video Goes Viral : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गत उपविजेत्या सनरायझर्स हैदराबादच्या संघानं एकदम दाबात सुरुवात केली. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात २८६ धावा ठोकून 'अब की बार ३०० पारचा नाराच त्यांनी दिला. पण त्यानंतर सलग तीन सामन्यात संघाच्या पदरी पराभव आला. परिस्थितीनुसार खेळण्याऐवजी गोलंदाजावर तुटून पडण्याच्या अप्रोचमुळे संघ अडचणीत सापडल्याचे दिसते. गुजरात टायटन्स विरुद्ध घरच्या मैदानावरील सामन्यातही पुन्हा तेच घडलं. संघ मालकीण काव्या मारनला ही गोष्ट खटकली अन् ती चिडल्याचेही पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आघाडीच्या फलंदाजांचा फ्लॉप शो बघून मालकीण खवळली

पहिल्या धमाकेदार विजयानंतर सलग तीन सामन्यातील पराभवातून सनरायझर्स हैदराबादच्या संघाने काहीच धडा घेतला नाही. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यातही आघाडीच्या फलंदाजांनी मैदानात तग धरण्याऐवजी मोठे फटकेबाजी मारण्याच्या नादात धडाधड विकेट गमावल्या. संघाचा हा अप्रोच संघ मालकीण काव्या मारनलाही खटकला. स्टँडमध्ये बसेलेल्या काव्या मारनचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यात काव्या मारन खेळाडूंना जणून बाबानों जरा थांबून खेळा...अशी काहीशी भावना व्यक्त करताना दिसून येत. 

IPL 2025 SRH vs GT : घरच्या मैदानात सिराजचा जलवा! ट्रॅविस हेडसह अभिषेक शर्माची विकेट घेत केली हवा

आता यांचे मी काय करू?   

पहिल्यांदा फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादच्या संघानं पॉवर प्लेमध्येच अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड यांच्या विकेट्स गमावल्या. सलामीवीरांच्या फ्लॉप शोनंतर स्टँडमध्ये बसलेल्या काव्या मारनचा चेहराच पडला. धावफलकावर ५० धावा असताना इशान किशनही माघारी फिरला. संघाच्या आघाडीच्या फलंदाजांचा ढिसाळ कामगिरीनंतर आता यांच मी काय करू? असा प्रश्नच काव्या मारनला पडल्याचे दिसून आले.  

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५सनरायझर्स हैदराबादगुजरात टायटन्सकाव्या मारनव्हायरल फोटोज्व्हायरल व्हिडिओ