Join us

Mohammed Siraj Record : सिराजसाठी दुग्धशर्करा योग! IPL मधील सर्वोच्च कामगिरीसह साधला 'शतकी' डाव

IPL मध्ये सिराजनं साजरं केलं विकेट्सच 'शतक' अशी कामगिरी करणारा भारताचा १२ वा जलदगती गोलंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 22:05 IST

Open in App

Mohammed Siraj Record :  सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील १९ व्या सामना हैदराबादच्या आंतरारष्ट्रीय राजीव गांधी स्टेडियमवर रंगल्याचे पाहायला मिळाले. हैदराबादसह गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून खेळणारा मोहम्मद सिराजही घरच्या मैदानात खेळण्यासाठी उतरला होता. या सामन्यात मोहम्मद सिराजनं आपल्या ४ षटकांच्या कोट्यात १७ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह त्याने खास विक्रमाला गवसणी घातली आहे.    

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!IPL मध्ये सिराजनं साजरं केलं विकेट्सच 'शतक' अशी कामगिरी करणारा भारताचा १२ वा जलदगती गोलंदाज

मोहम्मद सिराजनं गुजरात टायटन्सकडून दमदार कामगिरी करत आहे. या सामन्यातील चार विकेटसह यंदाच्या हंगामात त्याच्या खात्यात ९ विकेट्स जमा झाल्या आहेत. यासह सिराजनं आयपीएलमध्ये १०० विकेट्स घेण्याचा डाव साधला. आयपीएलमध्ये शंभर विकेट घेणारा भारताचा तो १२ वा जलदगती गोलंदाज आहे. मोहम्मद सिराज हा आयपीएलमध्ये १०० विकेट्स घेणारा २६ वा गोलंदाज आहे.  

IPL 2025 SRH vs GT : घरच्या मैदानात सिराजचा जलवा! ट्रॅविस हेडसह अभिषेक शर्माची विकेट घेत केली हवा

आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी

आयपीएलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील आपली सर्वोच्च कामगिरी नोंदवत त्याने हा शतकी डाव साधला आहे. याआधी २०२३ च्या हंगामात सिराजनं पंजाब किंग्ज विरुद्ध २१ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या होत्या. गुजरात विरुद्ध १७ धावांत चार विकेट्सचा पराक्रम करून दाखवत त्याने आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी नोंदवली.  

संघातून वगळलं, मिळालेल्या ब्रेकमध्ये घाम गाळला अन् सिराज अधिक घातक झाला

मोहम्मद सिराज हा नव्या चेंडूवर गोलंदाजी करताना प्रभावी ठरत नाही, असे कारण देत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून त्याला वगळण्यात आले होते. संघातून वगळल्यावर मिळालेल्या ब्रेकमध्ये आपल्यातील उणीव भरून काढत सिराज आयपीएलच्या मैदानात उतरला आहे. बुमराहचा वर्कलोड आणि शमीच्या अनुपस्थितीत सिराज सातत्याने भारतीय संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. परिणामी त्याच्या गोलंदाजीतील गतीही कमी झाली होती. मात्र ब्रेक नंतर आता तो १४० kph एवढ्या वेगाने चेंडू टाकताना दिसतोय. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५सनरायझर्स हैदराबादगुजरात टायटन्सइंडियन प्रीमिअर लीगमोहम्मद सिराज