SRH vs GT : काव्या मारनच्या नाकावर टिच्चुन 'सुंदर' खेळी; पण पहिली IPL फिफ्टी १ धावेनं हुकली

मागील तीन हंगामात ज्या सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून खेळला त्यांच्या विरुद्ध केली IPL मधील सर्वोच्च धावसंख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 00:37 IST2025-04-07T00:36:43+5:302025-04-07T00:37:37+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 SRH vs GT Washington Sundar Missed First IPL Fifty By 1 Run Against Kavya Maran Sunrisers Hyderabad | SRH vs GT : काव्या मारनच्या नाकावर टिच्चुन 'सुंदर' खेळी; पण पहिली IPL फिफ्टी १ धावेनं हुकली

SRH vs GT : काव्या मारनच्या नाकावर टिच्चुन 'सुंदर' खेळी; पण पहिली IPL फिफ्टी १ धावेनं हुकली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 SRH vs GT Washington Sundar Missed First IPL Fifty : हैदराबादच्या मैदानात रंगलेल्या आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील १९ व्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघानं घरच्या मैदानात खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाला ७ गडी राखून पराभूत केले. गुजरात टायटन्सच्या विजयात वॉशिंग्टन सुंदरनंही मोलाची भूमिका बजावली. अल्प पण आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या संघानं पहिल्या दोन विकेट्स स्वस्तात गमावल्या. साई सुदर्शन पाठोपाठ जोस बटलर ३ चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. बटलरची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या अष्टपैलू वॉशिंग्टनने फलंदाजीचा सुंदर नजराणा पेश करत मैफिल लुटली.  चौथ्या क्रमांकावर बढती मिळाल्यावर त्याला आयपीएलमध्ये पहिले अर्धशतक झळकावण्याची संधी होती. पण त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सुंदर खेळीला अतिसुंदर कॅचमुळे लागला ब्रेक 

आपल्या फिरकी गोलंदाजीने फलंदाजांंची गिरकी घेणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला गुजरातच्या  संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची बढती दिली. मागील तीन हंगामात तो ज्या हैदराबादच्या ताफ्यातून खेळताना दिसला होता त्याच संघाविरुद्ध त्याला फलंदाजीतील धमक दाखवण्याची संधी मिळाली. या संधीच त्याने सोनंही करून दाखवलं. २९ चेंडूत त्याने ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४९ धावा केल्या. त्याच्या सुंदर खेळीला अतिसुंदर कॅचनं ब्रेक लागला. 

SRH vs GT : हैदराबादच्या स्फोटक फलंदाजीचा फुगा पुन्हा फुटला! मॅच जिंकल्यावर शुबमन गिलनंही हाणला टोला!

काव्या मारनच्या नाकावर टिच्चुन वॉशिंग्टनची सुंदर खेळी

वॉशिंग्टन याने गुजरातच्या ताफ्याकडून खेळताना हैदराबाद विरुद्ध केलेली सुुंदर खेळी ही काव्या मारनला तिची मोठी चूक दाखवणारी अशी होती. मागील ३ हंगामात वॉशिंग्टन सुंदर हा ८.७५ कोटींसह ऑरेंज आर्मीतून खेळताना दिसला होता. पण आयपीएलच्या मेगा लिलावाआधी सनरायझर्स हैदराबादच्या संघानं त्याला रिलीज केले. गुजरातच्या संघाने ३.२० कोटीसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन त्याला बढती दिली अन् त्याने आपला जलवा दाखवा.  भरवसा न दाखवणाऱ्या माजी फ्रँचायझी संघाच्या मालकीणीच्या नाकावर टिच्चुन त्याने दमदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले.  

 आठ वर्षांत पहिल्यांदा पोहचला होता अर्धशतकाच्या उंबरठ्यावर, पण..

गुजरातच्या डावातील १४ व्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर वॉशिंग्टन सुंदरनं एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. अनिकेत वर्मानं अप्रतिम झेल घेत त्याचा हा फटका व्यर्थ ठरवला. या अतिसुंदर कॅचमुळे वॉशिंग्टन सुंदरची आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकवण्याची संधी अवघ्या एका धावेनं हुकली. या ऑलराउंडरनं २०१७ मध्ये बंगळुरुच्या संघातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. ८ वर्षांत तो पहिल्यांदा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहचला होता. पण मोठ्या फटकेबाजीची गरज नसताना त्याने हवेत चेंडू मारून मोठी संधी गमावली.  

Web Title: IPL 2025 SRH vs GT Washington Sundar Missed First IPL Fifty By 1 Run Against Kavya Maran Sunrisers Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.