Join us

SRH Star Abhishek Sharma: आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात दोन शतकं; IPL मध्ये अजून एकही नाही आलं

काव्या मारनच्या मालकीच्या संघात 'एक से बढकर एक' तगड्या फलंदाजांचा भरणा आहे. त्यांना रोखण्याचं मोठं आव्हान लखनौच्या गौलंदाजांसमोर असेल.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 08:36 IST

Open in App

IPL 2025 SRH vs LSG 7th Match Lokmat Player to Watch Abhishek Sharma : घरचं मैदान असलेल्या हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादचा संघ आपला दुसरा सामना रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा या हैदराबाद संघाच्या स्फोटक फलंदाजांवर  खिळलेल्या असतील. काव्या मारनच्या मालकीच्या संघात 'एक से बढकर एक' तगड्या फलंदाजांचा भरणा आहे. त्यांना रोखण्याचं मोठं आव्हान लखनौच्या गौलंदाजांसमोर असेल.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!पुन्हा एकदा धावांची 'बरसात' होणार? 

सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातील आघाडीच्या फलंदाजीतील प्रत्येक खेळाडू प्रतिस्पर्धी संघावर अक्षरश: तुटून पडतो. ते पुन्हा एकदा घरच्या मैदानात मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. पहिल्या सामन्यात ट्रॅविस हेडच्या अर्धशतकासह आणि इशान किशनच्या भात्यातून शानदार शतक पाहायला मिळाले होते. ही जोडी पुन्हा एकदा नजरेत भरणारी खेळी करण्यासाठी उत्सुक असतील. याशिवाय सलामीवीर अभिषेक शर्मा या सामन्यात हार्ड हिटिंगचा डाव साधणार का? तेही पाहण्याजोगे असेल.

ऑरेंज आर्मीची हवा! तेच ठोकतील का ३०० धावा? इथं पाहा IPL इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड

पहिल्या सामन्यात कडक बॅटिंग केली, पण...

ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मा ही जोडी हैदराबादच्या डावाची सुरुवात करते. आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत ते अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. हैदराबादच्या संघानं राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या लढतीनं यंदाच्या हंगामाची सुरुवात केली. पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मानं कडक सुरुवात केली. या सामन्यात त्याने जवळपास २११ च्या स्ट्राइक रेटनं ११ चेंडूत २४ धावा कुटल्या होत्या. ज्यात ५ चौकारांचा समावेश होता. पण त्याच्या भात्यातून एकही षटकार पाहायला मिळाला नाही. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन शतकं, पण आयपीएलमध्ये अजून एकही नाही आलं 

युवराज सिंगचा चेला असलेल्या अभिषेक शर्मा हा उत्तुंग फटकेबाजीसाठी ओळखला जातो. आधीची कसर भरून काढत षटकारांची आतषबाजी करत धावांचा पाऊस पाडणार का? ते पाहण्याजोगे असेल. आयपीएल आधी अभिषेक शर्मानं इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर १३५ धावांची खेळी केली होती. हे आंतरारष्ट्रीय कारकिर्दीतील त्याचे दुसरे टी-२० शतक होते. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात १७ सामन्यात २ शतके झळकवणाऱ्या अभिषेक शर्मानं आयपीएलमध्ये अजून एकही शतक झळकावलेले नाही. ६४ सामन्यात ७ अर्धशतके त्याच्या खात्यात जमा आहेत. ७५ ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. यंदाच्या हंगामात त्याच्या भात्यातून शतकी खेळी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. लखनौ विरुद्ध तो हा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५सनरायझर्स हैदराबादलखनौ सुपर जायंट्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट