Join us

SRH vs LSG : पहिल्या IPL विकेटसह प्रिन्स यादवनं लुटली मैफिल; ट्रॅविस हेडला केलं क्लीन बोल्ड (VIDEO)

तो अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना प्रिन्सनं त्याला क्लीन बोल्ड केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 20:34 IST

Open in App

First IPL Wicket of Prince Yadav Dismissed Travis Head Bowled :  आयपीएलच्या यंदाच्या हंगामात लखनौच्या ताफ्यातून पदार्पण करणाऱ्या प्रिन्स यादवनं ट्रॅविस हेडच्या रुपात दुसऱ्या सामन्यात पहिली विकेट आपल्या खात्यात जमा केली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धेत मिळालेली पहिली विकेट ही कोणत्याही गोलंदाजासाठी एकदम खासच असते. त्यात ती ट्रॅविस हेडची असल्यामुळे हा क्षण युवा भारतीय गोलंदाजासाठी अविस्मरणीय असाच आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने पहिल्या दोन विकेट्स लवकर गमावल्यावरही ट्रॅविस हेड आपल्या स्फोटक अंदाजात खेळताना दिसले. तो अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना प्रिन्सनं त्याला क्लीन बोल्ड केले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कोण आहे प्रिन्स यादव?

प्रिन्स यादव हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी करतो. तो मूळचा दिल्लीचा असून  देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडूनच खेळतो. २०२४ च्या हंगामात दिल्ली प्रीमियर लीगमध्ये त्याने व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीची खास झलक दाखवून देताना १३ विकेट्स घेत सर्वांचे लक्षवेधून घेतले होते. गोलंदाजी शैलीत बदल करून गतीमध्ये बदल करत फलंदाजाला चकवा देण्याची खासियत या गोलंदाजामध्ये आहे. दिल्ली प्रीमियर लीगमध्ये चमकल्यावर त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली. त्याआधी त्याने रणजी स्पर्धेत पदार्पण केले होते. 

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतसह विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही दाखवलाय जलवा  प्रिन्स यादवनं देशांतर्गत क्रिकेटमधील लोकप्रिय आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील २०२४-२५ च्या हंगामातील पहिला सामना उत्तर प्रदेश विरुद्ध खेळला होता. आयपीएल मेगा लिलावाआधी झालेल्या या सामन्यात त्याने  नितीश राणा आणि  समीर रिझवी यांच्या विकेट्स घेतल्या होत्या.  प्रिन्स यादवनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत ११ विकेट्स घेतल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही त्याने ११ विकेटसह दिल्लीकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. 

या गोलंदाजासाठी लखनौच्या संघानं किती रुपये मोजलेत माहितीये?

देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप सोडणाऱ्या अनकॅप्ड भारतीय गोलंदाजावर लखनौ सुपर जाएंट्सनं डाव लावला. मेगा लिलावात ३० लाख या मूळ किंमतीसह लखनौच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.  यंदाच्या हंगामातील दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातच त्याला पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात त्याने ४ षटकात ४७ धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या सामन्यात महागडा ठरल्यावरही लखनौनं दुसऱ्या सामन्यात त्याला संधी दिली अन् त्याने ट्रॅविस हेडची मोठी विकेट घेत आयपीएलमध्ये आपल्या विकेट्सच खाते उघडले. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५सनरायझर्स हैदराबादलखनौ सुपर जायंट्सइंडियन प्रीमिअर लीग