IPL 2025 SRH vs MI: 'पॉवरप्ले'मध्ये तो आपल्या गोलंदाजीतील ताकद दाखवणार का?

हैदराबादच्या मैदानात तो MI साठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो. जाणून घेऊयात या मैदानातील कसा आहे त्याचा रेकॉर्ड यासंदर्भातील माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:50 IST2025-04-23T18:47:24+5:302025-04-23T18:50:53+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 SRH vs MI 41st Match Lokmat Player to Watch Deepak Chahar Mumbai Indians | IPL 2025 SRH vs MI: 'पॉवरप्ले'मध्ये तो आपल्या गोलंदाजीतील ताकद दाखवणार का?

IPL 2025 SRH vs MI: 'पॉवरप्ले'मध्ये तो आपल्या गोलंदाजीतील ताकद दाखवणार का?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 SRH vs MI 41st Match Player to Watch Deepak Chahar Mumbai Indians : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अडखळत प्रवास करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघ पुन्हा एकदा चॅम्पियनच्या रुबाबात खेळताना दिसतोय. जसप्रीत बुमराहचं कमबॅक संघाच्या जमेची बाजू ठरतोय. याशिवाय CSK च्या ताफ्यातून पुन्हा घरवापसी केलेल्या गड्यावरही MI चा संघ सातत्याने भरवसा दाखवताना दिसते. तो चेहरा म्हणजे दीपक चाहर. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या वानखेडेच्या मैदानात त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. पण हैदराबादच्या मैदानात तो MI साठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो. जाणून घेऊयात या मैदानातील कसा आहे त्याचा रेकॉर्ड यासंदर्भातील माहिती 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

ट्रेंट बोल्ट प्रमाणे दीपक चाहरही 'पॉवर प्लेम'ध्ये धमक दाखवण्यात माहिर

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात जो पॉवर प्लेमध्ये ताकद दाखवतो तो संघ सामना जिंकता असा काहीसा ट्रेंड पाहायला मिळाला आहे.  मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर घरच्या मैदानात खेळणाऱ्या SRH संघातील स्फोटक फलंदाजीला लगाम घालण्याचे चॅलेंज असेल. यावेळी ट्रेंट बोल्ट पॉवर प्लेमध्ये प्रतिस्पर्धी संघाला धक्के देण्यात कमी पडलाय, आतापर्यंत त्याने फक्त पॉवर प्लेमध्ये दोनच विकेट घेतल्या आहेत. याशिवाय मुंबई इंडियन्सकडून दीपक चाहर पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळते. अप्रतिम स्विंगवर तो कोणत्याही फलंदाजासमोर आव्हान निर्माण करू शकतो. SRH विरुद्ध त्याने आपली ताकद दाखवली तर निश्चितच MI च्या संघाला त्याचा फायदा होईल.

IPL 2025 :काव्या मारनचा 'विक्रमी' डाव फसला! अर्धा हंगाम संपला; तरी या गड्यानं अर्धशतकाचा रकाना नाही भरला

पहिल्या सामन्यात विकेट लेस, पण...

मुंबई येथील वानखेडेच्या मैदानात दीपक चाहरला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट मिळवता आली नव्हती. त्याने प्रभावी मारा करत संधी निर्माण केल्या. पण क्षेत्रक्षकांची त्याला साथ मिळाली नाही. त्यामुळे तो मागे पडला. पण आता हैदराबादच्या मैदानात त्याचा रेकॉर्डही MI साठी जमेची बाजू ठरू शकतो. इथं त्याने आतापर्यंत ६१ चेंडूत ७८ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे. दोन उजव्या हाताच्या फलंदाजासह ३ डावखुऱ्यांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला आहे. यात एका निर्धाव षटकासह ३ विकेट्स हॉलच्या कामगिरीचाही समावेश आहे. त्यामुळे अभिषेक शर्मासह ट्रॅविसला जाळ्यात अडकवण्यासाठी MI साठी तो एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

दीपक चाहरची यंदाच्या हंगामातील कामगिरी

आतापर्यंत त्याने ८ सामन्यात २३ षटके गोलंदाजी करताना ६ विकेट्स घेतल्या आहेत. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात २ षटकात  १९ धावा खर्च करून २ विकेट्स ही त्याची यंदाच्या हंगामातील त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. आपल्या गोलंदाजीतील स्विंगची जादू दाखवून तो कामगिरी आणखी उंचावण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.

Web Title: IPL 2025 SRH vs MI 41st Match Lokmat Player to Watch Deepak Chahar Mumbai Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.