IPL 2025 :काव्या मारनचा 'विक्रमी' डाव फसला! अर्धा हंगाम संपला; तरी या गड्यानं अर्धशतकाचा रकाना नाही भरला

अर्धा हंगाम संपला तरी SRH च्या संघातील सर्वात महागड्या गड्याच्या भात्यातून मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 07:22 IST2025-04-23T07:09:59+5:302025-04-23T07:22:11+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 SRH vs MI 41st Match Lokmat Player to Watch Heinrich Klaasen Sunrisers Hyderabad | IPL 2025 :काव्या मारनचा 'विक्रमी' डाव फसला! अर्धा हंगाम संपला; तरी या गड्यानं अर्धशतकाचा रकाना नाही भरला

IPL 2025 :काव्या मारनचा 'विक्रमी' डाव फसला! अर्धा हंगाम संपला; तरी या गड्यानं अर्धशतकाचा रकाना नाही भरला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 SRH vs MI 41st Match Player to Watch Heinrich Klaasen Sunrisers Hyderabad : इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामात गत चॅम्पियन सनरायझर्स हैदराबाद संघानं अगदी धमाक्यात सुरुवात केली. पण संघाचा तोरा फार काळ टिकला नाही. भरवशाच्या स्फोटक फलंदजांच्या कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे SRH संघ गुणतालिकेत तळाला दिसतोय. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या  ७ सामन्यात फक्त २ सामने जिंकले आहेत. अर्धा हंगाम संपला तरी SRH च्या  संघातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या हेनरिच क्लासेन (Heinrich Klaasen) याच्या भात्यातून एकही मोठी खेळी आलेली नाही. त्याचा 'अर्धशतकी' रकाना अजूनही रिकामाच आहे.   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

IPL इतिहासात विक्रमी प्राइज टॅगसह रिटेन झालेला खेळाडू ठरलाय क्लासेन 

मेगा लिलावाआधी SRH ची मालकीण काव्या मारन हिने २३ कोटी मोजून हेनरिच क्लासेन याला आपल्या संघासोबत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.  तो IPL च्या इतिहासातील सर्वाधिक प्राइज टॅगसह रिटेन होणारा खेळाडू ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या या विकेट किपर बॅटरमध्ये धमाकेदार अंदाजात फटकेबाजीसह एकहाती मॅच फिरवण्याची क्षमता आहे. हंगामातील निम्मे सामने खेळूनही ही क्षमता काही दिसलेली नाही. त्यामुळेच  काव्या मारन हिने त्याच्यावर खेळलेला डाव फसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.  

KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)

पहिल्या सामन्यात २४२ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा, पण... 

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील आपल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने २८६ धावा केल्या होत्या. या सामन्यात क्लासेनच्या भात्यातून १४ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २४२.८ स्ट्राइक रेटनं ३४ धावा आल्या होत्या. पण त्यानंतर संघातील अन्य स्फोटक फलंदाजांसोबत त्याच्याही क्लास खेळीचा फुगा फुटला. निम्मा हंगाम संपल्यावर ७ सामन्यात त्याने २१० धावा केल्या आहेत. यात ३७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. आता उर्वरित सामन्यात क्लास खेळीसह तो संघासाठी तारणहार ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.

क्लासेनची  IPL मधील आतापर्यंतची कामगिरी

दक्षिण आफ्रिकेचा स्टार विकेट किपर बॅटरनं आतापर्यंत ४२ आयपीएल सामन्यात १२०३ धावा केल्या आहेत. यात एका शतकासह ६ अर्धशतकांचा समावेश आहे. ३७.५९ च्या सरासरीसह १६६.६२ च्या सरासरीने त्याने या धावा केल्या आहेत. RCB कडून पदार्पण केल्यावर मागील दोन हंगामात तो  ५.२५ कोटींसह सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसले होते. २०२५ च्या मेगा लिलावाआधी  SRH संघाने सव्वा पाच कोटीवरून त्याला थेट २३ कोटींची पगार वाढ दिली. पण त्याने किंमतीप्रमाणे हिंमत दाखवल्याचे दिसत नाही.
 

Web Title: IPL 2025 SRH vs MI 41st Match Lokmat Player to Watch Heinrich Klaasen Sunrisers Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.