Join us

IPL 2025 : आधी ट्रेंट बोल्टचा भेदक मारा; मग रोहितचा हिट शो! MI ची 'प्लेऑफ्स'च्या दिशेनं मोठी झेप!

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडिन्सच्या संघाने ७ विकेट्स आणि २४ चेंडू राखून विजय नोंदवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 23:24 IST

Open in App

IPL 2025 SRH vs MI : पहिल्यांदा गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्डसह दीपक चाहर, बुमराहचा भेदक मारा आणि त्यानंतर फलंदाजीमध्ये  हिटमॅन रोहित शर्मा आणि  सूर्यकुमार यादव यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने हैदराबादचं मैदान मारले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून घरच्या मैदानात खेळणाऱ्या हैदराबादच्या संघाला पहिल्यांदा फलंदाजीला निमंत्रित केले होते. पहिल्यांदा फलंदाजी करताना SRH च्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. ट्रॅविस हेड ०(४), अभिषेख शर्मा ८(८),  इशान किशन १ (४) आणि नितीश रेड्डी हे स्टार फलंदाज स्वस्तात माघारी फिरले. त्यानंतर  हेनरिच क्लासेन ४४ (७१) आणि अभिनव मनोहर ४३ (३७) या जोडीनं आश्वासक खेळी केल्यामुळे सनरायझर्स हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ८ बाद १४३ धावा करत मुंबई इंडियन्ससमोर १४४ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडिन्सच्या संगाने ७ विकेट्स आणि २४ चेंडू राखून विजय मिळवला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

या विजयासह MI नं प्लेऑफ्सच्या दिशेनं घेतली मोठी झेप

यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. पहिल्या पाच सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने फक्त एक सामना जिंकला होता. पण आता सलग ४ विजय नोंदवत ९ सामन्यातील ५ विजयासह मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या खात्यात १० गुण जमा केले आहे. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेत त्यांनी प्लेऑफ्सच्या दिशेने मोठी झेप घेतल्याचे पाहायला मिळते. दुसरीकडे  गत चॅम्पियन्स सनरायझर्स  हैदराबादचा मार्ग आता आणखी खडतर झाला आहे. कारण ८ सामन्यात त्यांच्या पदरी ६ पराभव पडला आहे.

इशान किशननं Not Out असताना सोडलं मैदान; त्याला OUT देताना अंपायरही झाला 'कावरा बावरा' (VIDEO)

बॅटिंगमध्ये हिटमॅन अन् सूर्यादादाचा धमाका

 हैदराबादच्या संघाने दिलेल्या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा या जोडीनं मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात केली. संघाच्या धावफलकावर १३ धावा असताना रायन रिकल्टन ८ टेंडूत ११ धावा करून तंबूत परतला. मग रोहित शर्मानं विल जॅक्सच्या साथीनं अर्धशतकी भागीदारी रचली. जॅक्सन १९ चेंडूत २२ धावांचे योगदान दिले. मग रोहित आणि सूर्यकुमार यादव या जोडीचा हिट शो पाहायला मिळाला. रोहित शर्मानं सलग दुसरे अर्धशतक झळकावताना ४६ चेंडूत ७० धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवनं १९ चेंडूत नाबाद ४० धावांची खेळी करत १६ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर सिक्सर मारत सामना संपवला. मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ट्रेंट बोल्टनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. दीपक चाहरला २ तर हार्दिक पांड्या आणि बुमराहला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादइंडियन प्रीमिअर लीगरोहित शर्मा