Rohit Sharma Record : ९ वर्षांनी हिटमॅनच्या भात्यातून आली बॅक टू बॅक फिफ्टी! खास विक्रमालाही गवसणी

विराट कोहलीनंतर असा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. एक नजर रोहित शर्माच्या खास रेकॉर्डवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 00:09 IST2025-04-24T00:05:27+5:302025-04-24T00:09:08+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 SRH vs MI Rohit Sharma Back To Back Fifties Completed 12 Thousand Runs In T20 Cricket | Rohit Sharma Record : ९ वर्षांनी हिटमॅनच्या भात्यातून आली बॅक टू बॅक फिफ्टी! खास विक्रमालाही गवसणी

Rohit Sharma Record : ९ वर्षांनी हिटमॅनच्या भात्यातून आली बॅक टू बॅक फिफ्टी! खास विक्रमालाही गवसणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 SRH vs MI Rohit Sharma Record : सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या भात्यातून यंदाच्या हंगामातील दुसरे अर्धशतक पाहायला मिळाले. धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या बॅटरने ४६ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ७० धावांची खेळी केली. याआधी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याने ४५ चेंडूत ७६ धावांची नाबाद खेळी केली होती. २०१६ च्या हंगामानंतर पहिल्यांदाच त्याच्या भात्यातून सलग दोन अर्धशतके पाहायला मिळाली आहेत. या दमदार खेळीसह त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात रोहित शऱ्मानं टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा टप्पा पार केला. हा मैलाचा पल्ला गाठणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. याआधी विराट कोहलीने हा पल्ला गाठल्याचे पाहायला मिळाले होते. यंदाच्या हंगामात रोहित शर्मा अडखळत खेळताना दिसला. पण चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यानंतर आता तो ट्रॅकवर आल्याचे दिसते.  रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ४२३१ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. याशिवाय उर्वरित धावा त्याने आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग स्पर्धेत केल्या आहेत. 

इशान किशननं Not Out असताना सोडलं मैदान; त्याला OUT देताना अंपायरही झाला 'कावरा बावरा' (VIDEO)

टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • क्रिस गेल- १४५६२ धावा (४६३ सामने)
  • एलेक्स हेल्स-  १३६१० धावा (४९४ सामने)
  • शोएब मलिक- १३५७१ धावा (५५७ धावा)
  • केरॉन पोलार्ड- १३५३७ धावा (६९५ सामने)
  • विराट कोहली- १३२०८ धावा (४०७ सामने)
  • डेविड वार्नर- १३०१९ धावा (४०४ सामने)
  • जोस बटलर- १२४६९ धावा (४४२ सामने)
  • रोहित शर्मा- १२०१३  धावा (४५६ सामने)

Web Title: IPL 2025 SRH vs MI Rohit Sharma Back To Back Fifties Completed 12 Thousand Runs In T20 Cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.