Join us

इम्पॅक्ट टाकण्यासाठी अय्यरनं यशवर डाव खेळला! अभिषेक शर्मा फसलाही, पण नो बॉल पडला अन्...

८ चेंडूवर २८ धावांवर खेळत असताना त्याला जीवनदान मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 22:34 IST

Open in App

Abhishek Sharma Gets A Life  No Ball From Yash Thakur :  घरच्या मैदानात पंजाब किंग्जनं दिलेल्या २४६ धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादच्या सलामी जोडीनं धमाकेदार सुरुवात केली. ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मानं पहिल्या ३ षटकात धावफलकावर ४० धावा लावत संघाला दमदार सुरुवात करून दिली. ही जोडी फोडण्यासाठी चौथ्या षटकात श्रेयस अय्यरनं इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात यश ठाकूरला मैदानात उतरवले. अय्यरनं खेळलेला हा डाव यशस्वीही ठरला. पण नो बॉलमुळे पंजाबचा घात झाला.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अय्यरनं इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात यश ठाकूरवर खेळला डाव, तो यशस्वी ठरला, पण नो  पडला अन्... 

यश ठाकूर इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मैदानात उतरला. चौथ्या षटकात तो गोलंदाजीला आला त्यावेळी अभिषेक शर्मा  ५ चेंडूत १८ धावांवर खेळत होता.  पहिला चेंडू निर्धाव  खेळल्यावर अभिषेक शर्मा या गोलंदाजावरही तुटून पडला. यश ठाकूरच्या  दुसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्मानं  खणखणीत चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारत त्याने आक्रमक अंदाजात इम्पॅक्ट प्लेयरचे स्वागत केले. पण चौथ्या चेंडूवर यश मोठा फटका मारताना तो फसला. त्याचा झेलही टिपला. पण हा चेंडू मैदानातील पंचांनी नो बॉल दिला अन् अभिषेक शर्माला जीवनदान मिळाले. या संधीच सोन करताना मग फ्री हिटवर सिक्सर मारत अभिषेक शर्मानं आपला हिट शो कायम ठेवला. ८ चेंडूवर २८ धावांवर खेळत असताना त्याला जीवनदान मिळाले. त्याने आपली वादळी खेळी कायम ठेवत सामना सनरायझर्स हैदराबादच्या बाजूनं सेट केला.  

Ishan Kishan Viral Video : इशान किशनने अडवलेला चेंडू हरवला; कॅप्टन पॅट कमिन्सला तो सापडला!

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५सनरायझर्स हैदराबादपंजाब किंग्सश्रेयस अय्यर