Join us

Ishan Kishan Viral Video : इशान किशनने अडवलेला चेंडू हरवला; कॅप्टन पॅट कमिन्सला तो सापडला!

या सामन्यातील पहिल्याच षटकात मैदानात एक मजेशीर दृश्य पाहायला मिळाले. आधी इशान गडबडला, दुसरीकडे फलंदाजांनीही केली घाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 21:06 IST

Open in App

हैदराबादच्या मैदानात  सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील २७ वा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. श्रेयस अय्यरनं या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिल्याच षटकात मैदानात एक मजेशीर दृश्य पाहायला मिळाले. 

इशान किशननं चेंडू अडवला, पण त्याला तो सापडेना, मैदानातील मजेशीर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल

पंजाब किंग्जच्या डावातील पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद शमीने ऑफ स्टंप धरून टाकलेला चेंडूवर प्रभसिमरन सिंग याने थेट गोलंदाजाच्या दिशेने फटका मारला.  इशान किशनने चेंडू अडवला. पण त्यानंतर त्याला चेंडूच सापडेना. तो अडवलेला चेंडू कुठं हरवला या विचारात पडला. चेंडू स्पॉन्सर मॅटवरील पांढऱ्या पट्टीवर असल्यामुळे तो इशान किशनला दिसला नाही. मग कर्णधार पॅट कमिन्स तिथं आला अन् चेंडू उचलला. हे दृश्ये मजेशीर असेच होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

गोंधळात गोंधळ; इशान किशननंतर फलंदाजही गडबडले  

चेंडू ग्राउंडवरून उचलल्यावर पॅट कमिन्सनं तो इशान किशनला दाखवला. या दरम्यान पंजाबच्या संघातील खेळाडूंनी दोन धावा घेतल्या. पण इशानच्या गोंधळात फलंदाजांनीही धाव घेताना गोंधळ केला. प्रभसिमरन आणि प्रियांश यांनी दोन धावा काढल्या. पण एक धाव शॉर्ट असल्यामुळे संघाला एकच धाव मिळाली. पंजाबच्या सलामी जोडीनं संघाला जबरदस्त सुरुवात करून देताना पहिल्या षटकात १४ धावा कुटल्या. प्रभसिमरन याने षटकातील अखेरच्या तीन चेंडूवर तीन चौकार मारल्याचे पाहायला मिळाले. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन जोडीनं पहिल्या तीन षटकातच धावफलकावर ५० धावा लावल्याचे पाहायला मिळाले.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५सनरायझर्स हैदराबादपंजाब किंग्सइशान किशनव्हायरल व्हिडिओइंडियन प्रीमिअर लीग