इशान किशनची शानदार नाबाद शतकी खेळीसह ट्रॅविस हेडच्या कडक अर्धशतकाच्या जोरावर घरच्या मैदानावर मोठी धावसंख्या उभारून सनरायझर्स हैदराबादच्या संघानं यंदाच्या हंगामाची सुरुवात दमदार विजयासह केली आहे. गत उपविजेत्या संघानं टॉस गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ बाद २८६ धावा करत राजस्थान रॉयल्ससमोर २८७ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाने २०० धावसंख्येचा आकडा पार केला. पण विक्रमी विजय नोंदवण्याचा पराक्रम करून दाखवणं काही त्यांना जमलं नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संजू समॅमसनसह ध्रुव जुरेलची फिफ्टी
सनरायझर्स हैदराबादच्या संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्या संघाची सुरुवातच खराब झाली. यशस्वी जैस्वाल अवघ्या एका धावेवर बाद झाला. त्यानंतर संजू स२मसन याने अर्धशतकी खेळी करत संघाच्या आशा पल्लवित केल्या पण तो संघाला विजय मिळवून देणारी मोठी खेळी करण्यात अपय़सी ठरला. त्याने ३७ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ६६ धावांची खेळी केल्या. त्याच्याशिवाय ध्रुव जुरेल याने ३५ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने ७० धावांची खेळी केली. याशिवाय हेटमायरनं २३ चेंडूत ४२ धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादच्या संघानं राजस्थान संघाला निर्धारित २० षटकात ६ बाद २४२ धावांवर रोखत ४२ धावांनी विजय नोंदवला.