Join us

IPL 2025 SRH vs RR : सेंच्युरीशिवाय इशान किशनच्या 'फ्लाइंग किस' सेलिब्रेशनची चर्चा

इशान किशनचा फ्लाइंग किस कुणासाठी होता? असा प्रश्न अनेकांना पडलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 20:51 IST

Open in App

सनरायझर्स हैदराबादच्या संघानं घरच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या लढतीत राजस्थान रॉयल्सच्या संघाला मात देत यंदाच्या हंगामाची दमदार सुरुवात केलीये. सनरायझर्सकडून पदार्पण करताना इशान किशन याने शतकी खेळीसह या सामन्यात खास छाप सोडली. तो ४७ चेंडूत १०६ धावांवर नाबाद राहिला. आयपीएल कारकिर्दीतील पहिल्या शतकी खेळीनंतर त्याने खास अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.

मैदानातील क्लास खेळी दरम्यान अर्धशतक झळकावल्यावर त्याने 'फ्लाइंग किस'सह खास सेलिब्रेशन केले. ही गोष्टही सध्या  चर्चेचा ठरतीये. त्याचा हा 'फ्लाइंग किस' कुणासाठी होता? असा प्रश्न अनेकांना पडलाय. एवढेच नाही काहींनी यासंदर्भातील अंदाज बाधून त्याचं उत्तरही देण्याचा प्रयत्न केला आहे. 

पण 'फ्लाइंग किस' कुणासाठी?

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यावेळी आपल्या ऑरेंज आर्मीला सपोर्ट करण्यासाठी SRH ची मालकीण काव्या मारनही स्टँडमध्ये स्पॉट झाली. आपल्या ताफ्यातील तुफान फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांना ती स्टँडमध्ये टाळ्या वाजवत दाद देताना दिसून आले. ट्रॅविस हेडच्या फटकेबाजीशिवाय इशान किशनच्या बॅटिंग बघताना काव्या मारनचा आनंद अगदी गगनाला भिडला होता. हाच दाखला देत इशान किशन याने दिलेला 'फ्लाइंग किस' हा काव्या मारनसाठी असावा, असा अंदाज काही नेटकऱ्यांनी बांधला आहे. 

इशान किशनचा तोरा अन् त्यामागचं MI फ्रँचायझीचं कनेक्शन

इशान किशनच्या फ्लाइंग किससंदर्भात रंगणाऱ्या चर्चेत अनेकजण आपल्या आपल्या परीने प्रतिक्रिया देताना दिसते. यात एका नेटकऱ्याने त्याचा हा तोरा मुंबई इंडियन्सला आपल्यातील धमक दाखवून देण्याचा एक इशारा होता, असा अंदाज बांधला आहे. व्हायर होणाऱ्या पोस्टमध्ये इशान किशन याचा फ्लाइंग किस हा काव्या मारनसाठी नाही तर तो मुंबई इंडिन्ससाठी आहे, असे वाटते, अशा अशायाची प्रतिक्रियाही उमटल्याचे पाहायला मिळते. जी सोशल मीडियावर व्हायरलही होतीये. सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात सामील होण्याआधी इशान किशन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळताना दिसला होता. पण मेगा लिलावाआधी त्याला संघानं नारळ दिला.  सनरायझर्स हैदराबादकडून धमाकेदार खेळीसह त्याने मुंबई इंडियन्सच्या संघानं रिलीज करण्याचा निर्णय चुकीचा होता हे ठरवल्याचे दाखवून देतोय, असाही अर्थ या व्हायरल पोस्टमध्ये दडलेला दिसतो. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५सनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्सइशान किशनकाव्या मारनमुंबई इंडियन्सनीता अंबानी