Riyan Parag Become 4th Youngest Captain In IPL : राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल २०२५ स्पर्धेतील दुसरा सामना खेळवण्यात येत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पॅट कमिन्स विरुद्ध रियान पराग टॉसचा बॉस झाला. राजस्थानच्या कर्णधारानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉससाठी मैदानात उतरताच रियान परागच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली. आयपीएलच्या इतिहासातील तो चौथा युवा कॅप्टन ठरला आहे. खास क्लबमध्ये एन्ट्री मारताना त्याने श्रेयस अय्यरला मागे टाकले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
... अन् रियान पराग झाला राजस्थान रॉयल्स संघाचा नवा कर्णधार
राजस्थान रॉयल्स संघाच्या ताफ्यातील नियमित कर्णधार संजू सॅमसन हा इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत दुखापतग्रस्त झाला होता. तो यातून सावरून संघात परतला आहे. पण यंदाच्या हंगामातील पहिल्या काही सामन्यात राजस्थानच्या संघ व्यवस्थापनाने त्याला इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात खेळवण्याचे ठरवले आहे. परिणामी कार्यवाहू कर्णधाराची माळ रियान परागच्या गळ्यात पडली. २३ वर्षे १३३ दिवस वय असताना तो आयपीएलमध्ये कॅप्टन्सी करत आहे. २०१८ च्या हंगामात श्रेयस अय्यरनं २३ वर्षे १४२ दिवस वय असताना दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते. रियान परागसमोर तो आता मागे पडलाय.
कोहलीच्या नावे आहे सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये कॅप्टन्सी करण्याचा रेकॉर्ड
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात कमी वयात कॅप्टन्सी करण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावे आहे. २०११ च्या हंगामात कोहलीने २२ वर्षे १८७ दिवस वय असताना आरसीबीचे नेतृत्व केले आहेत. त्यानंतर २०१३ मध्ये तो या संघाचा नियमित कर्णधार झाला होता.
IPL च्या इतिहासातील सर्वात कमी वयात नेतृत्व करताना दिसणारे खेळाडू
- विराट कोहली- २२ वर्षे १८७ दिवस
- स्टीव स्मिथ- २२ वर्षे ३४४ दिवस
- सुरेश रैना- २३ वर्षे ११२ दिवस
- रियान पराग- २३ वर्षे १३३ दिवस
- श्रेयस अय्यर- २३ वर्षे १४२ दिवस
रियान पराग हा आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स फ्रँचायझी संघाचा सातवा कर्णधारआहे. तो संजू सॅमसन, शेन वॉर्न, राहुल द्रविड, स्टीव स्मिथ, अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसन यांच्यात एलिट लिस्टमध्ये सामील झालाय.
Web Title: IPL 2025 SRH vs RR Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals 2nd Match Riyan Parag Become 4th Youngest Captain In IPL Overtake Shreyas Iyer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.