Join us

IPL 2025 SRH vs RR : ट्रॅविस हेडनं मारला १०५ मीटर लांब सिक्सर; त्याच्या बॅटिंगवर काव्या मारनही फिदा

ट्रॅविस हेडची तुफान फटकेबाजी, जोफ्रा आर्चरला तर धु धु धुतलें

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 17:17 IST

Open in App

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या यंदाच्या हंगामातील सलामीच्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा स्टार खेळाडू ट्रॅव्हिस हेडचा जलवा पाहायला मिळाला. स्फोटक फलंदाजाने पुन्हा एकदा आपल्यातील फटकेबाजीचा नजराणा दाखवून देत संघाला दमदार सुरुवात करून दिली. ३१ चेंडूत ६७ धावांवर तुषार देशपांडेनं त्याच्या खेळीला ब्रेक लावला. पण त्याआधी त्याने आपली जबाबदारी चोख पार पडली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ट्रॅविस हेडनं मारला १०५ मीटर लांब षटकार, जोफ्राच्या एका षटकात कुटल्या २२ धावा

ट्रविस हेडनं आपल्या धमाकेदार खेळीत ९ चौकार आणि ३ षटकार मारले. यात त्याने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर मारलेला षटकार बघण्याजोगा होता. हैदराबादच्या डावातील ५ व्या षटकात ट्रॅविस हेडच्या भात्यातून ४ चौकार आणि १ षटकार पाहायला मिळाला. एका षटकात २२ धावा कुटताना ट्रॅविस हेडनं १०५ मीटर लांब षटकार मारून लक्षवेधलं. त्याची फटकेबाजी पाहून संघाच्या मालकीण काव्या मारनही जाम खूश झाल्याचे पाहायला मिळाले. 

काव्या मारनही त्याच्या बॅटिंगवर फिदा 

सामन्यातील सर्वात लांब षटकारासह त्याची फटकेबाजी पाहून स्टेडियम स्टँडमध्ये बसेलली संघाची मालकीण काव्या मारन हिचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काव्या मारन टाळ्या वाजत ट्रॅविस हेडच्या फटकेबाजीला दाद देतानाही दिसून आले. ट्रॅविस हेड हा सध्याच्या घडीला कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. गत हंगामातही त्याचा धमाका पाहायला मिळाला. यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा तुफानी फटकेबाजीसाठी सज्ज असल्याचे  दाखवून दिले आहे. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५काव्या मारनसनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्स