Join us  

KKR चा 'भारी' डाव! श्रेयस अय्यरला रिटेन करणार नाही; फ्रँचायझीला होणार मोठा फायदा

shreyas iyer unlikely to be retained by kkr : श्रेयस अय्यरला केकेआरची फ्रँचायझी रिटेन करणार नसल्याचे कळते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 2:04 PM

Open in App

ipl 2025 retained players list : आगामी आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर या फ्रँचायझीचा भाग नसण्याची दाट शक्यता आहे. केकेआरची फ्रँचायझी अधिक पैसे घेऊन मेगा लिलावात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ते राईट टू मॅच कार्डद्वारे अनेक बड्या खेळाडूंना संघात सामील करण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणूनच श्रेयस अय्यरला केकेआरची फ्रँचायझी रिटेन करणार नाही. हर्षित राणा, सुनील नरेन, आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग या चार खेळाडूंना केकेआर रिटेन करणार असल्याचे कळते.

'क्रिकबज'ने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक संघ श्रेयस अय्यरशी बोलत आहेत. ज्यामध्ये पंजाब किंग्जच्या संघाचाही समावेश आहे. अलीकडेच पंजाब किंग्जने रिकी पाँटिंगला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. अय्यर पाँटिंगच्या प्रशिक्षणाखाली दिल्लीच्या संघाचा कर्णधार होता आणि त्याने संघाला अंतिम फेरीत नेले. 

...तर अय्यर लिलावातकेकेआरच्या संघाने श्रेयस अय्यरला रिटेन केले नाही तर तो मेगा लिलावात दिसू शकतो. जिथे अनेक संघ त्याच्यावर बोली लावू शकतात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघही अय्यरवर बोली लावू शकतो. कारण त्यांना मधल्या फळीतही चांगल्या भारतीय खेळाडूची गरज आहे. लिलावात खूपच कमी भारतीय खेळाडू असतील, ज्यांना एवढा अनुभव आहे.

दरम्यान, श्रेयस अय्यरला रिटेन न करुन केकेआरची फ्रँचायझी मोठ्या रकमेची बचत करू शकते. श्रेयसला आताच्या घडीला आयपीएलमधून १२.२५ कोटी रुपये एवढे मानधन मिळते. २०२२ च्या लिलावात केकेआरने त्याला खरेदी केले होते. मागील वर्षी अय्यरच्या नेतृत्वात केकेआरने चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. २०२२ च्या हंगामात अय्यरने ४०१ धावा केल्या, तर २०२३ मध्ये तो पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएलला मुकला. आयपीएलमध्ये एकूण नऊ हंगाम खेळलेल्या श्रेयसने आतापर्यंत ११५ सामन्यांमध्ये ३,१२७ धावा केल्या आहेत. 

टॅग्स :श्रेयस अय्यरकोलकाता नाईट रायडर्सआयपीएल २०२४