Ashish Nehra Angry, Viral Video IPL 2025 SRH vs GT: शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाने रविवारच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादला पराभूत केले. गुजरातने १७व्या षटकातच ७ विकेट्सने सामना जिंकला आणि गुणतालिकेत दुसरा नंबर पटकावला. हैदराबादने नितीश कुमार रेड्डीच्या सर्वाधिक ३१ धावांच्या बळावर अडखळत १५२ धावा केल्या. गुजरातने कर्णधार शुबमन गिलच्या ६१ धावांच्या जोरावर झटपट सामना जिंकला. या सामन्यात गुजरात संघाचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा भरमैदानात संतापलेला आणि आरडाओरडा करताना दिसला.
नेमकं काय घडलं?
आशिष नेहरा सहसा खूप शांत असतो पण कधीकधी तो त्याच्या संघाच्या खेळाडूंवर चिडताना दिसतो. यावेळीही असेच काहीसे घडले. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात साई किशोरने फिल्डिंगमध्ये केलेल्या चुकीमुळे नेहरा प्रचंड संतापला. ही घटना सामन्याच्या चौथ्या षटकात घडली. गुजरातचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा गोलंदाजी करत होता. इशांतने अभिषेक शर्माला एक लेंग्थ बॉल टाकला. अभिषेकने चेंडू मिड-ऑनकडे मारला. साई किशोर चेंडू पकडण्यासाठी धावला, पण चेंडू अडवता आला नाही. त्यामुळे त्याचा अंदाज चुकला. त्यामुळे चेंडू सुटला. चेंडू साई किशोरच्या समोर पडला आणि त्याच्या पलीकडे गेला. त्यामुळे अभिषेकला चौकार मिळाला. साई किशोरची ही चूक पाहून आशिष नेहराचा संयम सुटला. तो रागाने ओरडताना दिसला. पाहा व्हिडीओ-
इशांत शर्माला दंड
सामन्यादरम्यान इशांत शर्माला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. तथापि, आयपीएलने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये या घटनेचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यात फक्त एवढेच म्हटले होते की इशांतने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. त्याला लेव्हल १ चा दोषी आढळला आहे. इशांतने त्याची चूक मान्य केल्यामुळे, यावर पुढील सुनावणी होणार नाही. आयपीएल नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला दोषी ठरवले गेले आणि सामन्याच्या मानधनातील २५ टक्के रक्कम त्याला दंड म्हणून ठोठवण्यात आली. आयपीएलने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, इशांतने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. तो लेव्हल १ चा दोषी आढळला आहे. इशांतने त्याची चूक मान्य केली असून त्यावर सामनाधिकारी यांच्यापुढ्यात सुनावणी झाली आहे. IPL आचारसंहितेतील कलम २.२ अंतर्गत इशांत शर्माला दोषी ठरवण्यात आले आहे. मैदानावरील तयाची वागणूक अयोग्य असल्याने त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.