Join us

Video: Mumbai Indians च्या विजयानंतर नीता अंबानी ड्रेसिंग रूममध्ये! 1,2,3 म्हणताच सगळे ओरडले...

Nita Ambani Mumbai Indians Dressing Room Video, IPL 2025 MI vs SRH: संघ जिंकल्यानंतर मालकीण नीता अंबानी थेट ड्रेसिंग रूममध्ये आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 12:31 IST

Open in App

Nita Ambani Mumbai Indians Dressing Room Video, IPL 2025 MI vs SRH: मुंबई इंडियन्सने गुरूवारी यंदाच्या हंगामातील तिसरा सामना जिंकत विजयी लय मिळवली. त्यांनी सनरायजर्स हैदराबादचा ४ गडी आणि ११ चेंडू राखून पराभव केला. अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन आणि ट्रेव्हिस हेड या तिघांच्या छोटेखानी खेळीमुळे हैदराबादच्या धडाकेबाज फलंदाजांना २० षटकांत १६२ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विल जॅक्स, रायन रिकल्टन आणि सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबईने सामना जिंकला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी आणि सहमालक आकाश अंबानी थेट ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले आणि त्यांनी खेळाडूंसोबत जल्लोष करत आनंद साजरा केला.

नीता अंबानी, आकाश अंबानी ड्रेसिंग रूममध्ये...

संघ विजयी झाल्यानंतर नीता अंबानी खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी थेट ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्या. सोबत आकाश अंबानीही होते. त्यांनी तिथे जाऊन सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. ज्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली, त्यांचेही विशेष कौतुक केले. त्यानंतर सर्व खेळाडूंनी मिळून 'टीम हडल' तयार केले. नीता अंबानी या हर्डलमध्ये सहभागी झाल्या. आकाश अंबानीदेखील रोहित शर्माच्या खांद्यावर हात टाकून सहभागी झाले. कर्णधार हार्दिक पांड्याच्या शेजारी उभ्या राहून त्यांनी वन, टू, थ्री म्हणताच सर्वांनी मुंबई इंडियन्सच्या नावाचा जयजयकार केला आणि विजयाचा जल्लोष साजरा केला. हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने ट्विट केला आहे.

मुंबईने मिळवला हैदराबादवर विजय

हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा (४०) आणि ट्रेव्हिस हेड (२८) अपेक्षित फटकेबाजी करू शकले नाहीत. इशान किशन (२), नितीश कुमार रेड्डी (१९) देखील स्वस्तात माघारी परतले. हेनरिक क्लासेन (३७) आणि अनिकेत वर्माच्या (नाबाद १८) फटकेबाजीमुळे हैदराबादने १६२ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने (२६) वेगवान खेळी करण्याच्या प्रयत्नात बाद झाला. रायन रिकल्टन (३१), विल जॅक्स (३६), सूर्यकुमार यादवने (२६), कर्णधार हार्दिक पांड्या (२१) आणि तिलक वर्मा (नाबाद २१) यांच्या छोटेखानी खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने ४ गडी राखून सामना जिंकला.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सनीता अंबानीआकाश अंबानीरोहित शर्माहार्दिक पांड्या