Join us

असा पराक्रम करणारा पहिला भारतीय क्रिकेटर ठरला कोहली; जाणून घ्या त्याच्या नावे झालेला खास रेकॉर्ड

४०० व्या टी-२० सामन्यात किंग कोहलीच्या नावे झाला आणखी एक विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 21:39 IST

Open in App

कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर केकेआर आणि आरसीबी यांच्यातील लढतीनं आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरुवात झाली आहे.  २००८ च्या पहिल्या हंगामातही या दोन संघांमध्येच सलामीचा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात  रजत पाटीदार पहिल्यांदाच आरसीबीचे नेतृत्व करत आहे. दुसरीकडे  केकेआरचे नेतृत्वाची जबाबदारी अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर आहे. या दोघांशिवाय विराट कोहलीसाठी हा सामना एकदम खास ठरला. कारण कोहली ४०० टी-२० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला.  आणि रोहित शर्मा (४४८) आणि  दिनेश कार्तिक (४१२)  यांच्यानंतर ४०० टी-२० सामने खेळणारा विराट कोहली तिसरा भारतीय ठरलाय. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

असा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला कोहली कुणालाच जमलं नाही ते किंग कोह असा कामगिरी करणारा 

टी-२० क्रिकेटमधील ४०० व्या सामन्यासह विराट कोहलीनं आणखी एक खास विक्रम आपल्या नावे केलाय. ४०० टी सामने, ३०० वनडे आणि १०० कसोटी सामने खेळणारा तो पहिला भारतीय ठरलाय. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध त्याने ३०० वनडे खेळण्याचा पल्ला गाठला होता. याआधी २०२२ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध १०० वा कसोटी सामना खेळला होता. आतापर्यंतच्या कारकिर्दीत ३६ वर्षीय खेळाडूने ३०२ वनडे, ४०० टी-२० आणि १२३ कसोटी सामने खेळले आहेत.

किंग कोहलीचा इथंपर्यंतचा प्रवास 

विराट कोहलीनं टी-२० मध्ये पदार्पण २००७ मध्ये दिल्लीकडून केले होते. त्यानंतर २०१० मध्ये त्याने झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.  २००८ च्या पहिल्या हंगामापासून तो आयपीएलमध्ये खेळतोय. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ९ शतके आणि ९७ अर्धशतकांसह एकूण १२,८८६ धावा केल्या आहेत. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्स