Virat Kohli heart beats Video, IPL 2025 RCB vs RR: विराट कोहलीच्या RCB संघाचा स्पर्धेतील फॉर्म यावर्षी धमाकेदार आहे. RCB ने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. त्यापैकी ४ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे विराटचा संघ ८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तसेच त्यांचा नेट रनरेटही उत्तम आहे. रविवारी दुपारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्सशी झाला. या सामन्यात आरसीबीने राजस्थानचा सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना १७३ धावा केल्या होत्या. बंगळुरूने १७.३ षटकात १७५ धावा केल्या आणि ९ गडी राखून सामना जिंकला. सामन्यात विराट कोहलीने ६२ धावा केल्या. यावेळी एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली.
लाईव्ह मॅच दरम्यान विराटची तब्येत बिघडली...
सामन्यात विराट कोहलीने नाबाद खेळी केली. पण फलंदाजी करतानाही त्याचा काही अडचणींचा सामना करावा लागल्याचे दिसले. डावाच्या १५ व्या षटकात विराटने दुहेरी धाव घेतली. तो वेगाने दोन धावा पळून क्रीजमध्ये आला. त्यानंतर अचानक त्याला थोडी अस्वस्थता जाणवली. हृदयाचे ठोके वाढल्याचे कोहलीचे म्हणणे होते. त्यानुसार तो संजू सॅमसनकडे गेला आणि हृदयाचे ठोके तपासताना दिसला. त्यानंतर फिजीओदेखील कोहलीची तपासणी करताना दिसले आणि त्यानंतर कोहली पुन्हा खेळू लागला.
विराट कोहलीचे विक्रमी अर्धशतक
विराट कोहलीने सामन्यात ४५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावा केल्या. विराटचे टी२० क्रिकेटमधील हे १०० वे अर्धशतक होते. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याचबरोबर, विराट हा जगातील फक्त दुसरा फलंदाज आहे, ज्याने ही कामगिरी केली. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरने १०० अर्धशतके झळकावली होती.