Zaheer Khan angry, IPL 2025 LGS vs PBKS: 'आम्ही घरच्या मैदानावर खेळत होतो; पण असे काहीही वाटत नव्हते. असमान उसळी घेणारे चेंडू पाहून ही खेळपट्टी लखनौच्या नव्हे, तर पंजाबच्या क्युरेटरने तयार केली असावी, असा भास होत होता,' या शब्दात लखनौ संधाचा मेन्टॉर जहीर खान याने पंजावकडून झालेल्या पराभवानंतर सवाल उपस्थित केला.
लखनौचा तीन सामन्यांमध्ये हा दुसरा पराभव होता. १७२ धावांचा पाठलाग करणान्या पंजाबने प्रभसिमरनसिंग याच्या ३४ चेंडेतील ६९ धावांमुळे ८ गडी राखून विजय साजरा केला, जहीर म्हणाला, 'मी निराश आहे. हा घरच्या मैदानावर सामना होता. तुम्ही पाहिले असेल की, घरच्या मैदानावर स्थानिक संघाला लाभ होईल, अशी खेळपट्टी तयार केली जाते. क्यूरेटरने मात्र हा विचार केला नसेल, पंजाबच्या क्युरेटरने खेळपट्टी तयार केली असावी, असेच वाटत होते.
लखनौ संघात येण्याआधी जहीरने मुंबई संघात क्रिकेट विकास विश्व प्रमुखपद सांभाळले. क्यूरेटर पंजाबहून आला असावा. त्यामुळे स्थानिक चाहत्यांना आपल्या संघाला विजयी होताना पाहता आलेले नाही, अशी टीका त्याने केली. 'मी या संघासाठी नवीन आहे. नेमके काय घडले हे पाहावे लागेल. पुढे असे घडू नये आणि चाहत्यांच्या पदरी निराशा येऊ नये, याची काळजी घ्यावी लागेल. पराभवानंतरही माझा फोकस निकालापेक्षा प्रक्रियेवर असेल, काही गोष्टी सुधाराव्या लागतील. काही खेळाडू जखमी असल्याची मला चिंता नाही, पराभवानंतरही काही खेळाडूंची कामगिरी प्रभावी ठरली ही सकारात्मक बाव आहे. संघात विचारक्षमता, झुंजारवृत्ती आणि विजयाची भूक कायम राखून चाहत्यांना विजयाची भेट द्यायची आहे,' असे मत जहीरने व्यक्त केले.
कुणालाही सहज लेखू नका : पाँटिंग
यंदाच्या आयपीएलमध्ये कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाला सहजपणे घेऊ नका, असा मोलाचा सल्ला पंजाबचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉटिंग यांनी आपल्या खेळाडूंना दिला.
लखनौवर शानदार विजयानंतर अर्थशतकी खेळी करणारा कर्णधार श्रेयस अय्यर याची तुलना त्यांनी रॉल्स रॉयस तिसन्या गिअरमध्ये अशी केली, ते म्हणाले की, 'आम्ही जे काही केले त्यापेक्षा आक्रमक होण्याची गरज नाही. काहीही सहजपणे घेऊ नका.
कुटुंबासारखे सामूहिक प्रयत्न करून पुढे जाऊया. कामगिरीत सुधारणा होत जाईल. कोणताही खेळाडू पहिल्यांदा खेळत असो वा त्याला प्रथमच संधी मिळत असो, प्रत्येकाचे योगदान मोलाचे आहे. त्याचवेळी प्रतिस्पर्धी कमकुवत नाहीत, याचीही जाणीव असू द्या.'
Web Title: IPL 2025 Zaheer Khan gets angry on pitch curator after LSG vs PBKS clash Rishabh Pant
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.