Join us  

महिलांसाठीही आयपीएलचे आयोजन हवे

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) आयोजन महिलांसाठीही व्हायला हवे. यामुळे खेळाडूंमध्ये आर्थिक स्थैर्य यायला मदत मिळेल, असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मोना मेश्राम हिने सोमवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:11 AM

Open in App

नागपूर : इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) आयोजन महिलांसाठीही व्हायला हवे. यामुळे खेळाडूंमध्ये आर्थिक स्थैर्य यायला मदत मिळेल, असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मोना मेश्राम हिने सोमवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केले.आयसीसी महिला विश्वचषक उपविजेत्या भारतीय संघाची खेळाडू असलेल्या मोनाने स्पर्धेतील अनुभव कथन केले शिवाय महिला क्रिकेटच्या भविष्याबद्दल चर्चा करताना टीम इंडियाची कर्णधार मिताली राजच्या आयपीएल आयोजनाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. स्पोर्टस् जर्नलिस्ट ओससिशएन आॅफ नागपूरतर्फे (एसजेएएन) आयोजित या कार्यक्रमात मोनाचा सत्कार करण्यात आला. मनपा सत्तापक्षनेते संदीप जोशी आणि प्रसिद्ध क्रिकेट कोच शिशिर सुदामे यांनी मोनाचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.२०१२ पासून भारतीय महिला क्रिकेट संघाची महत्त्वपूर्ण खेळाडू असलेली मोना म्हणाली,‘आॅस्ट्रेलियात ‘बिग बाश’चे महिला क्रिकेटपटूंसाठी आयोजन होते. आमच्या दोन सहकारी हरमित कौर आणि स्मृती मानधना तेथे नियमित खेळत असल्याने दोघींच्याही अनुभवात भर पडली आहे. हरमितने संपूर्ण विश्वचषकात ज्या ताकदीने दमदार खेळ केला त्यावरून तिचा अनुभव किती चांगला आहे हे पदोपदी जाणवत होते. भारतीय खेळाडूंना अनुभव मिळावा, यासाठी भारतातही महिलांसाठी आयपीएल आयोजन सुरू करण्याची वेळ आली आहे. महिला क्रिकेटपटूंची संख्या वाढविण्यासाठी ही लीग प्रेरणादायी ठरेल.’विश्वचषकातील देदीप्यमान कामगिरीनंतर भारतीय महिला क्रिकेटचे भविष्य कसे राहील, असा प्रश्न विचारताच मध्य रेल्वेची कर्मचारी असलेली मोना म्हणाली,‘ भारतीय महिला क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे. विश्वचषकातील सामन्यांचे टीव्हीवरील थेट प्रक्षेपणामुळे लोक आम्हाला ओळखू लागले आहेत. आम्हाला समाजाकडून आणि बीसीसीआयकडून प्रोत्साहन हवे. बीसीसीआयने विश्वचषकाची तयारी म्हणून फार पूर्वी शिबिरे लावली शिवाय अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिली होती. आमच्या सांघिक यशात बीसीसीआयचा देखील मोलाचा वाटा राहिला आहे.’विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ अनपेक्षितपणे नऊ धावांनी इंग्लंडकडून पराभूत झाला. यावर मध्यम जलद गोलंदाज मोना म्हणाली,‘आम्ही ऐतिहासिक जेतेपदाच्या काठावर होतो. पण दुसरीकडे इंग्लंड संघाला स्थानिक प्रेक्षकांचा पाठिंबा होता. आम्हाला अनुभव कमी पडल्याने दडपण वाढतच गेले. त्याआधी चॅम्पियन आॅस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य सामन्यात सकारात्मक खेळल्यामुळेच आम्ही विजयी ठरल्याचे मोनाने सांगितले.व्हीसीएने महिला क्रिकेट संघासाठी अंजू जैन या अनुभवी आंतरराष्टÑीय खेळाडूला कोच नेमले आहे. या प्रयत्नांचे कौतुक करीत अंजू यांचा अनुभव विदर्भाला राष्टÑीय पातळीवर भरीव कामगिरी करण्यास उपयुक्त ठरेल, असे मत मांडले.