बेंगळुरूः इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या पर्वातील लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व संघमालकांनी युवा खेळाडूंना आपल्या संघात संधी दिली. पहिल्या दिवशी आठ संघानी 78 खेळाडूंना खरेदी केलं. यामध्ये 49 भारतीय आणि 29 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. इंग्लंडच्या बेन स्टोकला राजस्थान रॉयल्सनं 12.5 कोटी रुपयांत खेरदी केलं. स्टोक पहिल्या दिवशी सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर भारतीय खेळाडूमध्ये मनिष पांड्ये आणि लोकेश राहुल यांना प्रत्येकी 11 कोटीची बोली लागली. लोकेश राहुलला पंजाबनं तर मनिष पांड्येला हैदराबादनं खरेदी केलं. आठ संघांचे मालक आज लिलावाच्या दुसऱ्या दिवशी धडाकेबाज खेळाडूवर बोली लावण्यासाठी सज्ज झालेत. त्यात कोण हिरो ठरतो आणि कुणावर रिकाम्या हाताने परतण्याची वेळ येते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.....
- क्षितीज शर्मा 20 लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे
- पवन देशपांडे 20 लाखांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
- आर्यमान बिर्ला 30 लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडे
- मेहंदी हसनला सनरायझर्स हैदराबादनं 20 लाखांना केले खरेदी
- चेन्नई सुपरकिंग्जनं मोनू सिंगला 20 लाखांना केले खरेदी
- सॅम बिल्गींज 1 कोटींच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्जकडे
- मुरली विजय 2 कोटी रुपयांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्जकडे
- न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलवरही बोली नाही
- सलग दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलवर कोणत्याही संघमालकाची बोली नाही
- पहिल्या दिवसांमध्ये बोली न लागलेल्या खेळाडूंचा पुन्हा लिलाव होणार
IPL Auction 2018 : या दिग्गज खेळाडूंना 'भाव नाही', आयपीएलमध्ये नाही मिळाला कोणी खरेदीदार
IPL Auction 2018 : सोळावं वरीस मोक्याचं... 'हा' १६ वर्षीय अफगाणी क्रिकेटपटू झाला कोट्यधीश
- एम.एस. मिधुन 20 लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडे
- अनिरुद्ध जोशी 20 लाख रुपयांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
- ध्रुव शौरी 20 लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे
- कनिष्क सेठ 20 लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार
- शरद लुंबा 20 लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार
- दक्षिण आफ्रिकेच्या लुंगसानी एनजिडी 50 लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार
- 17वर्षीय नेपाळी क्रिकेट संदीप लामिचहने 20 लाखांच्या बोलीवर दिल्ली डेअर डेविल्स संघाकडून खेळणार
- आसिफ के.एम. 40 लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे
- बेन ड्वार्शियस एक कोटी 40 लाखांच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार
- ऑस्ट्रेलियाचा 31 वर्षीय अँड्रू टाय पंजाबच्या संघात, 7.20 कोटींमध्ये केलं खरेदी
- न्यूझीलंडचा मिचेल सँटनर 50 लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्जच्या भात्यात
- ऑस्ट्रेलियाचा जेसन बेहरनडॉर्फ मुंबई इंडियन्स संघाकडे, बोली एक कोटी 50 लाख
- ख्रिस जॉर्डन एक कोटींच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडे
- न्यूझीलंडचा मिचेल सँटनर 50 लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार
- दक्षिण आफ्रिकेचा जेपी ड्युमिनी झाला मुंबईकर, एक कोटींमध्ये केलं खरेदी
- जगदीशन नारायण 20 लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार
- अनुरित सिंह ३० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार
- दिल्लीचा प्रदीप संगवान एक कोटी 50 लाखांमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार
- नथू सिंहवर कोणत्याही संघमालकाकडून बोली नाही
- बिपूल शर्मा, स्वप्निल सिंग, एडन मार्क्रम, अॅश्टन अॅगर, हिल्टन कार्टराइट, निकोलस पूरन, केदार देवधर, मिहीर हिरवाणी, मयंक मार्कंडे या खेळाडूंवर बोली नाही
- अभिषेक शर्मा दिल्लीच्या संघात, 55 लाखांत केलं खरेदी
- प्रविण दुबेला खरेदीदार नाही
- 19 वर्षीय अष्टपालू शिवम मावी केकेआरकडे, तीन कोटींमध्ये केलं खरेदी
- मनजोत कालरा 20 लाखांच्या बोलीवर दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार
- सचिन बेबी 20 लाखांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
- रिंकू सिंह 80 लाखांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार
- महाराष्ट्राच्या अपुर्व वानखेडेवर कोलकाता नाईट रायडर्सची 20 लाखांची बोली
- अंकित शर्मा राजस्थान रॉयल्सकडे
- प्रज्ञान ओझावर कोणत्याही संघाकडून बोली नाही, राहिला अनसोल्ड
- मुजीब झदरान चार कोटींच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार
- मोहम्मद सिराज 2 कोटी 60 लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
- नॅथन कुल्टर नाईल 2 कोटी 20 लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
- आर. विनय कुमार कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, बोली एक कोटी
- संदीप शर्मा 3 कोटी रुपयांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडे
- मोहीत शर्मा 2 कोटी 40 लाखांच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे
- रिशी धवनवर बोली नाही
- अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी एक कोटी रुपयांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
- बेन कटींग दोन कोटी 20 लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार
- ऑस्ट्रेलियाच्या मॉईजेस हेन्रिकेजवरही बोली नाही
- न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज कोरी अँडरसनवर बोली नाही
- न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे, बोली २ कोटी २० लाख
- मुंबईकर शार्दूल ठाकूर चेन्नईच्या भात्यात, 2.60 कोटींमध्ये केलं खरेदी
- दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनला कोणही बोली लावली नाही, राहिला अनसोल्ड
- धवल कुलकर्णी राजस्थानच्या भात्यात, 75 लाखांत केलं खरेदी
- राहुल आणि मनिषला पछाडत जयदेव उनाडकट ठरला सर्वात महागडा भारतीय खेळाडू, राजस्थानने 11.50 कोटीमध्ये केलं खरेदी
- केसी करियप्पा अनसोल्ड, 20 लाख होती बेस प्राइज
- शहबाज नदीम दिल्ली डेयरडेविल्स कडे, 3.2 कोटींमध्ये केलं खरेदी
- साईं किशोर रवि श्रीनिवासन अनसोल्ड, 20 लाख होती बेस प्राइज
- तेजस बरोका अनसोल्ड, 20 लाख होती बेस प्राइज
- जे सुचिथ अनसोल्ड, 20 लाख होती बेस प्राइज
- गौतम कृष्णप्पाचं नशिब फळफळलं, राजस्थान रॉयल्स 6.2 कोटींमध्ये केलं खरेदी, 20 लाख होती बेस प्राइज
- इकबाल अब्दुल्ला अनसोल्ड 30 लाख बेस प्राइज
- शिविल कौशिक अनसोल्ड 20 लाख होती बेस प्राइज
- गुरकिरत सिंहला दिल्ली डेअरडेविल्सने 75 लाखांना खरेदी केले
- मोहम्मद नबी ऐसखील एक कोटींना सनरायझर्स हैदराबादकडे
- बेन कटिंग 2.2 कोटी रुपयांमध्ये मुंबई इंडियन्स टीममध्ये
- जयंत यादव 50 लाखांमध्ये दिल्ली डेअरडेविल्सकडे
- डॅनियल क्रिस्टीएन 1.5 कोटींमध्ये दिल्ली डेअरडेविल्सकडे
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुरुगन आश्विनला 2.2 कोटी रुपयांना खरेदी केले
- एविन लूईसला मुंबईनं 3.8 कोटींमध्ये केलं खरेदी, सलामीविर म्हणून मुंबईनं दिली पसंती
- सौरभ तिवारीची घरवापसी, मुंबईनं 80 लाखात केलं खरेदी
- एलेक्स हेल राहिला अनसोल्ड, एक कोटी होती बेस प्राईज
- इंग्लंडच्या इयान मॉर्गनला कोणी खरेदीदार मिळाला नाही
- ऑस्ट्रेलियनं शॉन मार्शवर कोणीही नशीब अजमावलं नाही, पंजाबच्या संघाकडून खेळला आहे.
- वेस्ट इंडिजच्या लिंडल सिमंसवर कोणीही बोली लावली नाही, गेल्यावर्षी मुंबईच्या संघात होता.
- मनदिप सिंह आरसीबीकडे, 1.4 कोटींमध्ये केलं खरेदी
- ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडवर कोणीही बोली लावली नाही, 1.5 कोटी होती बेसप्राईज
- कोलिन इंग्रमावर कोणही बोली लावली नाही, बेस प्राईज होती दोन कोटी.
- मनोज तिवारी पंजाबच्या संघात, एक कोटींमध्ये केलं खऱेदी
- अष्टपैलू पवन नेगीला आरसीबीनं 'राइट टू मॅच' कार्ड वापरत एक कोटीमध्ये केलं खरेदी
- 18 वर्षीय वॉशिंगटन सुंदर आरसीबीच्या भात्यात, 3.20 कोटींमध्ये केलं खरेदी
- IPL Auction 2018 : 11 वर्षात आयपीएलमध्ये हा बदल कधीच झाला नाही
Web Title: IPL Auction 2018 2nd Day LIVE: 18-year-old Washington, at the RCB flat, Corey Anderson, Shaun Marsh Ansold
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.