बंगळुरु - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 11व्या सीझनसाठी बंगळरुमध्ये सध्या लिलाव सुरु असून दोन दिवस सुरु असलेल्या लिलावात आठ फ्रॅंचायझी ब-याच देशांतर्गत आणि परदेशी खेळाडूंसाठी बोली लावत आहेत. आयपीएलच्या गेल्या 11 वर्षांच्या प्रवासादरम्यान आतापर्यंत अनेक बदल झाले आहेत. खेळाडूंच्या जर्सी पासून संघ व्यवस्थापन यामध्ये बरेच बदल झाले, पण या 11 वर्षांत काहीही बदल झाला नसेल तर आयपीएलच्या लिलावाची घोषणा करणारा तो माणूस. ज्या माणसाच्या अनुपस्थितीत लिलाव करण्याची कल्पना करणेच थोडे अवघड आहे.
2008 पासून ते 2018 आयपीएलच्या या 11 वर्षांच्या प्रवासात काय बदलले गेले नाही. होय! आयपीएलमध्ये लिलावाची बोली सांगणारे बोलेर रिचर्ड मेडली हे या स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून आयपीएलशी जोडले गेले आहेत. रिचर्ड मेडली इंग्लंडचे रहिवाशी असून जगातील सर्वोत्तम लिलावकर्त्या पैकी ते एक आहेत. त्यांच्याबद्दलची एक विशिष्ट गोष्ट म्हणजे रिचर्डचे वडील देखील एक लिलावकर्ते होते. मेडली यांनी इंग्लंडच्या सरे संघाच्या वतीने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे, तर रिचर्ड हे एक माजी हॉकी खेळाडू देखील आहेत. मेडलीने बीबीसी चॅनेलसाठी अनेक शो होस्ट केले, परंतु स्वतःच असा विश्वास आहे की आयपीएलमध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्या जीवनात खूप बदल झाला आहे.
दरम्यान, आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी जयदेव उनाडकट भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे. मनिष पांडे आणि लोकेश राहुल यांना मागे टाकत जयदेन उनाडकट सर्वात जास्त बोली लागलेला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याला राजस्थान रॉयल्स या संघाने तब्बल 11 कोटी 50 लाखांची बोली लावत आपल्या संघात दाखल करुन घेतलेलं आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे आजच्या दिवशीही संघमालकांनी परदेशी खेळाडूंवर लक्ष केंद्रीत न करता भारतीय खेळाडूंना आपल्या संघात सामवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. संघमालकांच्या या प्रयत्नात अनेक भारतीय खेळाडूंना चांगल्या रकमेच्या बोली लागलेल्या दिसत आहेत. गौथम कृष्णाप्पा हा खेळाडू 6 कोटी 20 लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. याव्यतिरीक्त वॉशिंग्टन सुंदर, मोहीत शर्मा, संदीप शर्मा, मोहम्मद सिराज या खेळाडूंनाही चांगल्या रकमेच्या बोली लागल्या. त्यामुळे उरलेल्या सत्रात कोणत्या खेळाडूला किती रकमेची बोली लागते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.