IPL Auction 2018: पाच खेळाडूंची झाली घरवापसी, लिलावात पहिल्यांदाच 'राइट टू मॅच कार्डाचा' वापर

आयपीएलच्या 11 व्या मोसमसाठी सुरु असलेला खेळाडूंचा लिलाव खूपच रंगतदार ठरत आहे. भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनपासून लिलावाला सुरुवात झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 11:42 AM2018-01-27T11:42:17+5:302018-01-27T13:44:06+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2018: First-time use of right-to-match cards for auction, 4 players retain by franchise | IPL Auction 2018: पाच खेळाडूंची झाली घरवापसी, लिलावात पहिल्यांदाच 'राइट टू मॅच कार्डाचा' वापर

IPL Auction 2018: पाच खेळाडूंची झाली घरवापसी, लिलावात पहिल्यांदाच 'राइट टू मॅच कार्डाचा' वापर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देशिखर धवनला किंग्ज इलेव्हन पंजाबने 5.2 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले होते. मुंबई इंडियन्सने राइट टू मॅच कार्डचा वापर करुन किरॉन पोर्लाडला आपल्याकडे कायम ठेवले.

बंगळुरु- आयपीएलच्या 11 व्या मोसमसाठी सुरु असलेला खेळाडूंचा लिलाव खूपच रंगतदार ठरत आहे. भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनपासून लिलावाला सुरुवात झाली. शिखर धवनला किंग्ज इलेव्हन पंजाबने 5.2 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले होते. पण धवनची जुनी फ्रेंचायजी सनरायजर्स हैदराबादने राइट टू मॅच कार्डाचा वापर करुन धवनला आपल्याकडेच कायम ठेवले. 

त्यानंतर मुंबई इंडियन्सने राइट टू मॅच कार्डचा वापर करुन किरॉन पोर्लाडला आपल्याकडे कायम ठेवले. पोलार्डला दिल्ली डेअर डेव्हिल्सने 5.4 कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर मुंबईने लगेचच आरटीएम कार्डचा वापर केला. 

बेस प्राईस 1.5 कोटी रुपये असलेल्या फॉफ डुप्लेसीला 1.6 कोटी रुपयांना किंग्ज इलेव्हन पंजाबने विकत घेतले होते. पण चेन्नई सुपर किंग्जने आरटीएम कार्डाचा वापर करुन आपल्याकडे कायम ठेवले.  

डेव्हिड मिलरला मुंबई इंडियन्सने तीन कोटींना विकत घेतले पण किंग्ज इलेव्हन पंजाबने आरटीएम कार्डाचा वापर केला.                                      

अजिंक्य रहाणेला किंग्ज इलेव्हन पंजाबने 4 कोटींना विकत घेतले होते. पण राजस्थान रॉयल्सने आरटीएम कार्डचा वापर करुन रहाणेला 4 कोटींना विकत घेतेल.            

काय आहे राइट यू मॅचचा नियम 
ज्या खेळाडूची विक्री झाली आहे तो प्लेयर 'राइट टू मॅच' नियमाच्या निकषामध्ये बसत असेल तर जुन्या संघाला तो खेळाडू परत मिळू शकतो. उदहारणार्थ ज्या संघाने त्याला विकत घेतले आहे त्या संघाचे मालक जुन्या फ्रेंचायजीला आरटीएम नियमातंर्गत तो खेळाडू हवा का म्हणून विचारतील. जुन्या संघाने होकार दिला तर तो खेळाडू त्याच किंमतीला पुन्हा जुन्या संघामध्ये जाईल. जुन्या फ्रेंचायजीने नकार दिला तर ज्या संघाने बोली लावून विकत घेतलेय त्या संघाकडून खेळेल. 

Web Title: IPL Auction 2018: First-time use of right-to-match cards for auction, 4 players retain by franchise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.