Join us  

IPL Auction 2018 Highlights : वाचा कोणत्या खेळाडूला मिळाली किती किंमत? कोणत्या संघानं दिली संधी?

वाचा दोन दिवसांत कोणत्या खेळाडूंवर संघ मालकांनी जुगार खेळला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 6:15 PM

Open in App

बेंगळुरूः  इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या पर्वातील लिलावाच्या दोन दिवसांत अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांच्या बोली लागल्या, तर अनेकांच्या पदरी निराशा पडली.  लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व संघमालकांनी युवा खेळाडूंना आपल्या संघात संधी दिली आहे. त्यातून काही युवा खेळाडूंना मोठी रक्कम या लिलावात मिळाली. महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वाधिक बोली लागलेले दोन्ही खेळाडू हे राजस्थान रॉयल्स संघाकडेच आलेले आहेत. बेन स्टोक्स 12 कोटींपेक्षा जास्त रकमेसह तर जयदेव उनाडकट 11 कोटी 50 लाखांसह राजस्थानच्या ताफ्यात दाखल झाला आहे. मनिष पांडे आणि लोकेश राहुल यांना मागे टाकत जयदेव उनाडकट सर्वात जास्त बोली लागलेला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याला राजस्थान रॉयल्स या संघाने तब्बल 11 कोटी 50 लाखांची बोली लावत आपल्या संघात दाखल करुन घेतलेलं आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे आजच्या दिवशीही संघमालकांनी परदेशी खेळाडूंवर लक्ष केंद्रीत न करता भारतीय खेळाडूंना आपल्या संघात सामवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. वाचा दोन दिवसांत कोणत्या खेळाडूंवर संघ मालकांनी जुगार खेळला...

  • चिराग गांधी, आकाश भंडारी, हिम्मत सिंग, दुष्मान्ता चामिरा यांच्यावर बोली नाही
  • मिशेल जॉन्सन २ कोटींत कोलकाता नाइट रायडर्सकडे; त्याच्या बेस प्राइजएवढी त्याची किंमत
  • जेव्हन सेअरलेस 30 लाखांच्या बोलीवर कोलकाता संघाकडे
  • मंजदूर दर 20 लाखांच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे
  • निधीशम दिनेशन 20 लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार
  • श्रीलंकेच्या दुष्मंता चमीराला 50 लाखांच्या बोलीत राजस्थान रॉयल्सने विकत घेतलं
  • अखेरच्या फेरीपर्यंत न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलवर बोली नाहीच
  • अखेर ख्रिस गेलला बोली लागली, दोन कोटी रुपयांच्या बोलीमध्ये पंजाबसाठी खेळणार गेल
  • क्षितीज शर्मा 20 लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे
  • पवन देशपांडे 20 लाखांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
  • आर्यमान बिर्ला 30 लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडे 
  • मेहंदी हसनला सनरायझर्स हैदराबादनं 20 लाखांना केले खरेदी
  • चेन्नई सुपरकिंग्जनं मोनू सिंगला 20 लाखांना केले खरेदी
  • सॅम बिल्गींज 1 कोटींच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्जकडे
  • मुरली विजय 2 कोटी रुपयांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्जकडे
  • न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलवरही बोली नाही
  • सलग दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलवर कोणत्याही संघमालकाची बोली नाही
  • पहिल्या दिवसांमध्ये बोली न लागलेल्या खेळाडूंचा पुन्हा लिलाव होणार
  • IPL Auction 2018 : या दिग्गज खेळाडूंना 'भाव नाही', आयपीएलमध्ये नाही मिळाला कोणी खरेदीदार

  • IPL Auction 2018 : सोळावं वरीस मोक्याचं... 'हा' १६ वर्षीय अफगाणी क्रिकेटपटू झाला कोट्यधीश

  • एम.एस. मिधुन 20 लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडे
  • अनिरुद्ध जोशी 20 लाख रुपयांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
  • ध्रुव शौरी 20 लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे
  • कनिष्क सेठ 20 लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार
  • शरद लुंबा 20 लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार
  • दक्षिण आफ्रिकेच्या लुंगसानी एनजिडी 50 लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार
  • 17वर्षीय नेपाळी क्रिकेट संदीप लामिचहने 20 लाखांच्या बोलीवर दिल्ली डेअर डेविल्स संघाकडून खेळणार
  • आसिफ के.एम. 40 लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे
  • बेन ड्वार्शियस एक कोटी 40 लाखांच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार
  • ऑस्ट्रेलियाचा 31 वर्षीय अँड्रू टाय पंजाबच्या संघात, 7.20 कोटींमध्ये केलं खरेदी
  • न्यूझीलंडचा मिचेल सँटनर 50 लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्जच्या भात्यात
  • ऑस्ट्रेलियाचा जेसन बेहरनडॉर्फ मुंबई इंडियन्स संघाकडे, बोली एक कोटी 50 लाख 
  • ख्रिस जॉर्डन एक कोटींच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडे
  • न्यूझीलंडचा मिचेल सँटनर 50 लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार
  • दक्षिण आफ्रिकेचा जेपी ड्युमिनी झाला मुंबईकर, एक कोटींमध्ये केलं खरेदी
  • जगदीशन नारायण 20 लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार
  • अनुरित सिंह ३० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार
  • दिल्लीचा प्रदीप संगवान एक कोटी 50 लाखांमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार
  • नथू सिंहवर कोणत्याही संघमालकाकडून बोली नाही
  • बिपूल शर्मा, स्वप्निल सिंग, एडन मार्क्रम, अॅश्टन अॅगर, हिल्टन कार्टराइट, निकोलस पूरन, केदार देवधर, मिहीर हिरवाणी, मयंक मार्कंडे या खेळाडूंवर बोली नाही 
  • अभिषेक शर्मा दिल्लीच्या संघात, 55 लाखांत केलं खरेदी
  • प्रविण दुबेला खरेदीदार नाही
  • 19 वर्षीय अष्टपालू शिवम मावी केकेआरकडे, तीन कोटींमध्ये केलं खरेदी
  • मनजोत कालरा 20 लाखांच्या बोलीवर दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार
  • सचिन बेबी 20 लाखांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
  • रिंकू सिंह 80 लाखांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार
  • महाराष्ट्राच्या अपुर्व वानखेडेवर कोलकाता नाईट रायडर्सची 20 लाखांची बोली 
  • अंकित शर्मा राजस्थान रॉयल्सकडे
  • प्रज्ञान ओझावर कोणत्याही संघाकडून बोली नाही,  राहिला अनसोल्ड
  • मुजीब झदरान चार कोटींच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार 
  • मोहम्मद सिराज 2 कोटी 60 लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
  • नॅथन कुल्टर नाईल 2 कोटी 20 लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
  • आर. विनय कुमार कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, बोली एक कोटी 
  • संदीप शर्मा 3 कोटी रुपयांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडे 
  • मोहीत शर्मा 2 कोटी 40 लाखांच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे 
  • रिशी धवनवर बोली नाही 
  • अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी एक कोटी रुपयांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
  • बेन कटींग दोन कोटी 20  लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार
  • ऑस्ट्रेलियाच्या मॉईजेस हेन्रिकेजवरही बोली नाही
  • न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज कोरी अँडरसनवर बोली नाही  
  • न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे, बोली २ कोटी २० लाख 
  • मुंबईकर शार्दूल ठाकूर चेन्नईच्या भात्यात, 2.60 कोटींमध्ये केलं खरेदी
  • दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनला कोणही बोली लावली नाही, राहिला अनसोल्ड
  • धवल कुलकर्णी राजस्थानच्या भात्यात, 75 लाखांत केलं खरेदी 
  • राहुल आणि मनिषला पछाडत जयदेव उनाडकट ठरला सर्वात महागडा भारतीय खेळाडू, राजस्थानने 11.50 कोटीमध्ये केलं खरेदी 
  • केसी करियप्पा  अनसोल्ड,  20 लाख होती बेस प्राइज
  • शहबाज नदीम दिल्ली डेयरडेविल्स कडे,  3.2 कोटींमध्ये केलं खरेदी    
  • साईं किशोर रवि श्रीनिवासन अनसोल्ड,  20 लाख होती बेस प्राइज
  • तेजस बरोका  अनसोल्ड,  20 लाख होती बेस प्राइज
  • जे सुचिथ  अनसोल्ड,   20 लाख होती बेस प्राइज
  • गौतम  कृष्णप्पाचं नशिब फळफळलं,  राजस्थान रॉयल्स 6.2 कोटींमध्ये केलं खरेदी,  20 लाख होती बेस प्राइ
  • इकबाल अब्दुल्ला अनसोल्ड 30 लाख बेस प्राइज
  • शिविल कौशिक अनसोल्ड  20 लाख होती बेस प्राइज
  • गुरकिरत सिंहला दिल्ली डेअरडेविल्सने 75 लाखांना खरेदी केले 
  • मोहम्मद नबी ऐसखील एक कोटींना सनरायझर्स हैदराबादकडे 
  • बेन कटिंग 2.2 कोटी रुपयांमध्ये मुंबई इंडियन्स टीममध्ये  
  • जयंत यादव 50 लाखांमध्ये दिल्ली डेअरडेविल्सकडे 
  • डॅनियल क्रिस्टीएन 1.5 कोटींमध्ये दिल्ली डेअरडेविल्सकडे
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुरुगन आश्विनला 2.2 कोटी रुपयांना खरेदी केले
  • एविन लूईसला मुंबईनं 3.8 कोटींमध्ये केलं खरेदी, सलामीविर म्हणून मुंबईनं दिली पसंती
  • सौरभ तिवारीची घरवापसी, मुंबईनं 80 लाखात केलं खरेदी
  • एलेक्स हेल राहिला अनसोल्ड, एक कोटी होती बेस प्राईज
  • इंग्लंडच्या इयान मॉर्गनला कोणी खरेदीदार मिळाला नाही
  • ऑस्ट्रेलियनं शॉन मार्शवर कोणीही नशीब अजमावलं नाही, पंजाबच्या संघाकडून खेळला आहे. 
  • वेस्ट इंडिजच्या लिंडल सिमंसवर कोणीही बोली लावली नाही, गेल्यावर्षी मुंबईच्या संघात होता. 
  • मनदिप सिंह आरसीबीकडे, 1.4 कोटींमध्ये केलं खरेदी
  •  ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडवर कोणीही बोली लावली नाही, 1.5 कोटी होती बेसप्राईज
  • कोलिन इंग्रमावर कोणही बोली लावली नाही, बेस प्राईज होती दोन कोटी. 
  • मनोज तिवारी पंजाबच्या संघात, एक कोटींमध्ये केलं खऱेदी
  • अष्टपैलू पवन नेगीला आरसीबीनं 'राइट टू मॅच' कार्ड वापरत एक कोटीमध्ये केलं खरेदी
  •  18 वर्षीय वॉशिंगटन सुंदर आरसीबीच्या भात्यात, 3.20 कोटींमध्ये केलं खरेदी    
  • IPL Auction 2018 : 11 वर्षात आयपीएलमध्ये हा बदल कधीच झाला नाही 
  • कृणाल पांड्याचं नशीब फळफळलं... मुंबई इंडियन्सनं राइट टू मॅच वापरलं... 8 कोटी 80 लाखांची बोली... 
  • 19 वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ दिल्लीकडून खेळणार... 1 कोटी 20 लाख रुपयांना केलं खरेदी...
  • अंडर-19चा स्टार फलंदाज शुभमन गिल कोट्यधीश... केकेआरनं लावली 1.80 कोटींची बोली...
  •  सूर्य कुमारसाठी मुंबई इंडियन्सनं मोजले 3 कोटी 20 लाख रुपये...
  • युझवेंद्र चहलसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं वापरलं राइट टू मॅच कार्ड... 6 कोटींना खरेदी... 
  • अमित मिश्रावर 4 कोटींची बोली... दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळणार...
  •  अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानवर तब्बल 9 कोटींची बोली... सनरायजर्स हैदराबादने 'राइट टू मॅच' वापरून राशिदला राखलं... 
  • कर्ण शर्माही चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणार... 5 कोटींची बोली... 
  •  इम्रान ताहीरवर 1 कोटींची बोली... चेन्नई सुपरकिंग्जकडून खरेदी...
  • कोलकात्याने राइट टू मॅच वापरून पियुष चावलाला 4.20 कोटींना खरेदी केलं... 
  • लसिथ मलिंगाला खरेदीदारच नाही... 
  •  कागिसो रबाडा दिल्ली डेअरडेविल्सकडेच... 4 कोटी 20 लाखांची बोली... दिल्लीने वापरलं 'राइट टू मॅच' कार्ड... 
  •  मिचेल मॅक्लेनॅघनवर बोली नाही... 
  •  मोहम्मद शामीवर 3 कोटींची बोली... दिल्ली डेअरडेविल्सने वापरलं 'राइट टू मॅच' कार्ड...
  • टीम इंडियाचा गोलंदाज ईशांत शर्मालाही खरेदीदार नाही... 
  • टीम साउदीवर कुणीच लावली नाही बोली... 
  • उमेश यादव रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळणार...  4 कोटी 20 लाखांची बोली...
  •  पॅट कमिन्स मुंबईकडून खेळणार... 5 कोटी 40 लाखांना खरेदी...  
  • जोश हेझलवूडवरही बोली नाही...
  • मिचेल जॉन्सनला खरेदीदार नाही...
  •  मुस्तफिझूर रहमान मुंबई इंडियन्समध्ये... 2 कोटी 20 लाखांची बोली... 
  • जोस बटलर राजस्थानकडे... 4 कोटी 40 लाखांना खरेदी...
  • अंबाती रायुडूनेही पकडली चेन्नई एक्स्प्रेस... 2 कोटी 20 लाखांची बोली...
  •  संजू सॅमसनला लॉटरी... राजस्थान रॉयल्सनी 8 कोटींना खरेदी केलं... 
  • रॉबिन उथप्पा कोलकात्याकडूनच खेळणार... मुंबईने 6 कोटी 40 लाखांची बोली लावल्यानंतर कोलकात्यानं वापरलं 'राइट टू मॅच' कार्ड 
  •  नमन ओझावर बोली नाही... 
  •  दिनेश कार्तिक कोलकाता नाइट रायडर्सकडे... 7 कोटी 40 लाखांची बोली... 
  • जॉनी बेअरस्टोला खरेदीदार नाही... 
  • वृद्धिमान साहा सनरायजर्स हैदराबादकडे... 5 कोटींना खरेदी... 
  • क्विंटन डी कॉक आरसीबीकडून खेळणार... 2 कोटी 80 लाखांची बोली...
  •  पार्थिव पटेलवर बोली नाही... 
  •  मार्कस स्टॉयनिसवर 6 कोटी 20 लाखांची बोली... किंग्स इलेव्हन पंजाबने वापरलं 'राइट टू मॅच' कार्ड
  • स्टुअर्ट बिन्नीला मिळाले अवघे 50 लाख... राजस्थान रॉयल्सकडून खेळणार...
  •  कॉलिन मन्रो दिल्ली डेअरडेविल्सकडे... 1 कोटी 90 लाखांची बोली...
  • युसुफ पठाणला खरेदीदार सापडला... 1 कोटी 90 लाख मोजून सनरायजर्स हैदराबादने घेतलं ताफ्यात...
  • ऑल राउंडर जेम्स फॉकनरला खरेदीदारच नाही...
  • कोलिन दि ग्रँडहोम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडे... 2 कोटी 20 लाखांना खरेदी...
  • केदार जाधव चेन्नईकडून खेळणार... 7 कोटी 80 लाख रुपयांची बोली... 
  • शेन वॉटसनसाठी चेन्नई सुपरकिंग्जने मोजले 4 कोटी...
  • वेस्ट इंडीजचा कार्लोस ब्रॅथवेट सनरायजर्स हैदराबादकडून खेळणार... 2 कोटींना केलं खरेदी...
  •  ख्रिस वोक्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडे... 7 कोटी 40 लाखांची बोली... 
  •  मनीष पांडेचा चमत्कार... सनरायजर्स हैदराबादने लावली 11 कोटींची बोली... 
  • हशिम आमला आणि मार्टिन गप्टिलला खरेदीदारच नाही... 
  • ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस लिनचा धक्का... कोलकात्यानं लावली 9 कोटी 60 लाखांची बोली...
  • जेसन रॉय स्वस्तात... दिल्ली डेअरडेविल्सनं 1.50 कोटींना खरेदी केलं... 
  • ब्रॅण्डन मॅकलम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडे... 3 कोटी 60 लाखांची बोली... 
  • अॅरॉन फिन्च किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात... 6 कोटी 20 लाख रुपयांना खरेदी...
  • डेव्हिड मिलरला पंजाबनं आपल्याकडेच ठेवलं राखलं... मुंबईने 3 कोटींना खरेदी केल्यानंतर पंजाबने वापरलं 'राइट टू मॅच' कार्ड... 
  • मुरली विजयवर बोली नाही...
  • के एल राहुलचा झंझावात... 11 कोटींची बोली... राहुल किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात...
  • करूण नायरला लॉटरी... किंग्ज इलेव्हन पंजाबची 5 कोटी 60 लाखांची बोली... 
  • युवराज सिंग पुन्हा किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात... युवीला मिळाले 2 कोटी...
  • न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला सनरायजर्स हैदराबादने खरेदी केलं... 3 कोटींची बोली. 
  • इंग्लंडचा कर्णधार जो रूटवर बोली नाही...  
  • ड्वेन ब्राव्हो धोनीसेनेत... ब्राव्होवर 6 कोटी 40 लाखांची बोली लागल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जनं वापरलं 'राइट टू मॅच' कार्ड
  • कोलकात्याचा कर्णधार राहिलेला गौतम गंभीर आता दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळणार... 2 कोटी 80 लाखांची बोली.
  • ग्लेन मॅक्सवेल दिल्ली डेअरडेविल्सकडे... 9 कोटींना केलं खरेदी... 
  •  शाकिब अल हसन सनरायजर्स हैदराबादकडे... 
  • हरभजनसिंग आता धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार... चेन्नई सुपरकिंग्जनं 2 कोटींना केलं खरेदी...
  • ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणार... 9.40 कोटींची लॉटरी...
  • अजिंक्य रहाणे पुन्हा राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात... 4 कोटींची बोली... 'राइट टू मॅच' वापरून राजस्थान0नं अजिंक्यला राखलं
  •  द. आफ्रिकेचा फाफ डुप्लेसिस चेन्नई सुपरकिंग्जकडे... 1 कोटी 60 लाखांच्या बोलीनंतर चेन्नईनं वापरलं 'राइट टू मॅच' कार्ड...
  • किरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्सकडूनच खेळणार... 'राइट टू मॅच' नियमानुसार 5.40 कोटींना खरेदी...
  • बेन स्टोक्स राजस्थान रॉयल्सकडून खेळणार... स्टोक्सला 12 कोटी 50 लाखांची लॉटरी...
  • रविचंद्रन अश्विनवर 7 कोटी 60 लाखांची बोली... टीम इंडियाचा जादुगार फिरकीपटू किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात...  
  • शिखर धवन सनरायजर्स हैदराबादकडे... 'राइट टू मॅच'चा वापर करत 5.20 कोटींना खरेदी... 

 

 

टॅग्स :आयपीएल 2018आयपीएल लिलावआयपीएल लिलाव 2018आयपीएल