IPL Auction 2018 LIVE: कृणाल पांड्याचं नशीब फळफळलं, 8 कोटी 80 लाखांची बोली

इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या पर्वासाठी आजपासून खेळाडूंचा लिलाव होतोय. आठ संघांचे मालक धडाकेबाज खेळाडूवर बोली लावण्यासाठी सज्ज झालेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 10:39 AM2018-01-27T10:39:26+5:302018-01-27T17:19:25+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2018 LIVE Catch all the action through the day | IPL Auction 2018 LIVE: कृणाल पांड्याचं नशीब फळफळलं, 8 कोटी 80 लाखांची बोली

IPL Auction 2018 LIVE: कृणाल पांड्याचं नशीब फळफळलं, 8 कोटी 80 लाखांची बोली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बेंगळुरूः इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या पर्वासाठी आजपासून खेळाडूंचा लिलाव होतोय. आठ संघांचे मालक धडाकेबाज खेळाडूवर बोली लावण्यासाठी सज्ज झालेत. त्यात कोण हिरो ठरतो आणि कुणावर रिकाम्या हाताने परतण्याची वेळ येते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

17.10 - कृणाल पांड्याचं नशीब फळफळलं... मुंबई इंडियन्सनं राइट टू मॅच वापरलं... 8 कोटी 80 लाखांची बोली... 

16.30 - 19 वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ दिल्लीकडून खेळणार... 1 कोटी 20 लाख रुपयांना केलं खरेदी...

16.10 - अंडर-19चा स्टार फलंदाज शुभमन गिल कोट्यधीश... केकेआरनं लावली 1.80 कोटींची बोली...

16.00 - सूर्य कुमारसाठी मुंबई इंडियन्सनं मोजले 3 कोटी 20 लाख रुपये...

15. 50 - युझवेंद्र चहलसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं वापरलं राइट टू मॅच कार्ड... 6 कोटींना खरेदी... 

15.45 - अमित मिश्रावर 4 कोटींची बोली... दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळणार...

15.40 - अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानवर तब्बल 9 कोटींची बोली... सनरायजर्स हैदराबादने 'राइट टू मॅच' वापरून राशिदला राखलं... 

15.30 - कर्ण शर्माही चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणार... 5 कोटींची बोली... 

15.25 - इम्रान ताहीरवर 1 कोटींची बोली... चेन्नई सुपरकिंग्जकडून खरेदी...

15.20 - कोलकात्याने राइट टू मॅच वापरून पियुष चावलाला 4.20 कोटींना खरेदी केलं... 

15.15- लसिथ मलिंगाला खरेदीदारच नाही... 

15.10 - कागिसो रबाडा दिल्ली डेअरडेविल्सकडेच... 4 कोटी 20 लाखांची बोली... दिल्लीने वापरलं 'राइट टू मॅच' कार्ड... 

15.03 - मिचेल मॅक्लेनॅघनवर बोली नाही... 

15.01 - मोहम्मद शामीवर 3 कोटींची बोली... दिल्ली डेअरडेविल्सने वापरलं 'राइट टू मॅच' कार्ड...

14.59 - टीम इंडियाचा गोलंदाज ईशांत शर्मालाही खरेदीदार नाही... 

14.57 - टीम साउदीवर कुणीच लावली नाही बोली... 

14.56 - उमेश यादव रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळणार...  4 कोटी 20 लाखांची बोली...

14.50 - पॅट कमिन्स मुंबईकडून खेळणार... 5 कोटी 40 लाखांना खरेदी...  

14.47 - जोश हेझलवूडवरही बोली नाही...

14.47 - मिचेल जॉन्सनला खरेदीदार नाही...

14.45 - मुस्तफिझूर रहमान मुंबई इंडियन्समध्ये... 2 कोटी 20 लाखांची बोली... 

14.43 - जोस बटलर राजस्थानकडे... 4 कोटी 40 लाखांना खरेदी...

14.35 - अंबाती रायुडूनेही पकडली चेन्नई एक्स्प्रेस... 2 कोटी 20 लाखांची बोली...

14.30 - संजू सॅमसनला लॉटरी... राजस्थान रॉयल्सनी 8 कोटींना खरेदी केलं... 

14.24 - रॉबिन उथप्पा कोलकात्याकडूनच खेळणार... मुंबईने 6 कोटी 40 लाखांची बोली लावल्यानंतर कोलकात्यानं वापरलं 'राइट टू मॅच' कार्ड 

14.19 - नमन ओझावर बोली नाही... 

14.18 - दिनेश कार्तिक कोलकाता नाइट रायडर्सकडे... 7 कोटी 40 लाखांची बोली... 

14.13 - जॉनी बेअरस्टोला खरेदीदार नाही... 

14.11 - वृद्धिमान साहा सनरायजर्स हैदराबादकडे... 5 कोटींना खरेदी... 

14.07 - क्विंटन डी कॉक आरसीबीकडून खेळणार... 2 कोटी 80 लाखांची बोली...

14.03 - पार्थिव पटेलवर बोली नाही... 

13.00 - मार्कस स्टॉयनिसवर 6 कोटी 20 लाखांची बोली... किंग्स इलेव्हन पंजाबने वापरलं 'राइट टू मॅच' कार्ड

12.57 - स्टुअर्ट बिन्नीला मिळाले अवघे 50 लाख... राजस्थान रॉयल्सकडून खेळणार...

12.55 - कॉलिन मन्रो दिल्ली डेअरडेविल्सकडे... 1 कोटी 90 लाखांची बोली...

12.52 - युसुफ पठाणला खरेदीदार सापडला... 1 कोटी 90 लाख मोजून सनरायजर्स हैदराबादने घेतलं ताफ्यात...

12.50 - ऑल राउंडर जेम्स फॉकनरला खरेदीदारच नाही...

12.47 - कोलिन दि ग्रँडहोम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडे... 2 कोटी 20 लाखांना खरेदी...

12.44 - केदार जाधव चेन्नईकडून खेळणार... 7 कोटी 80 लाख रुपयांची बोली... 

12.40 - शेन वॉटसनसाठी चेन्नई सुपरकिंग्जने मोजले 4 कोटी...

12.35 - वेस्ट इंडीजचा कार्लोस ब्रॅथवेट सनरायजर्स हैदराबादकडून खेळणार... 2 कोटींना केलं खरेदी...

12.30 - ख्रिस वोक्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडे... 7 कोटी 40 लाखांची बोली... 

12.22 - मनीष पांडेचा चमत्कार... सनरायजर्स हैदराबादने लावली 11 कोटींची बोली... 

12.20 - हशिम आमला आणि मार्टिन गप्टिलला खरेदीदारच नाही... 

12.10 - ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस लिनचा धक्का... कोलकात्यानं लावली 9 कोटी 60 लाखांची बोली...

12.05 - जेसन रॉय स्वस्तात... दिल्ली डेअरडेविल्सनं 1.50 कोटींना खरेदी केलं... 

12.00 - ब्रॅण्डन मॅकलम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडे... 3 कोटी 60 लाखांची बोली... 

11.53 - अॅरॉन फिन्च किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात... 6 कोटी 20 लाख रुपयांना खरेदी...

11.50- डेव्हिड मिलरला पंजाबनं आपल्याकडेच ठेवलं राखलं... मुंबईने 3 कोटींना खरेदी केल्यानंतर पंजाबने वापरलं 'राइट टू मॅच' कार्ड... 

11.45 - मुरली विजयवर बोली नाही...

11.43 - के एल राहुलचा झंझावात... 11 कोटींची बोली... राहुल किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात...

11.40 - करूण नायरला लॉटरी... किंग्ज इलेव्हन पंजाबची 5 कोटी 60 लाखांची बोली... 

11.34 - युवराज सिंग पुन्हा किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात... युवीला मिळाले 2 कोटी...


 
11.30 - न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला सनरायजर्स हैदराबादने खरेदी केलं... 3 कोटींची बोली... 


11.28- इंग्लंडचा कर्णधार जो रूटवर बोली नाही... 

11.25 - ड्वेन ब्राव्हो धोनीसेनेत... ब्राव्होवर 6 कोटी 40 लाखांची बोली लागल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जनं वापरलं 'राइट टू मॅच' कार्ड... 



11.20 - कोलकात्याचा कर्णधार राहिलेला गौतम गंभीर आता दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळणार... 2 कोटी 80 लाखांची बोली... 


11.13 - ग्लेन मॅक्सवेल दिल्ली डेअरडेविल्सकडे... 9 कोटींना केलं खरेदी... 


11.10 - शाकिब अल हसन सनरायजर्स हैदराबादकडे... 

11.05 - हरभजनसिंग आता धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार... चेन्नई सुपरकिंग्जनं 2 कोटींना केलं खरेदी...


10.55 - ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणार... 9.40 कोटींची लॉटरी...


10.50 - अजिंक्य रहाणे पुन्हा राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात... 4 कोटींची बोली... 'राइट टू मॅच' वापरून राजस्थान0नं अजिंक्यला राखलं... 


 
 

10.45 - द. आफ्रिकेचा फाफ डुप्लेसिस चेन्नई सुपरकिंग्जकडे... 1 कोटी 60 लाखांच्या बोलीनंतर चेन्नईनं वापरलं 'राइट टू मॅच' कार्ड...


10.40 - किरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्सकडूनच खेळणार... 'राइट टू मॅच' नियमानुसार 5.40 कोटींना खरेदी...



 

10.33 - बेन स्टोक्स राजस्थान रॉयल्सकडून खेळणार... स्टोक्सला 12 कोटी 50 लाखांची लॉटरी...



10.30 - आश्चर्य.... टी-20 मधील स्फोटक फलंदाज ख्रिस गेलवर बोली नाही!

10.25 - रविचंद्रन अश्विनवर 7 कोटी 60 लाखांची बोली... टीम इंडियाचा जादुगार फिरकीपटू किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात...  



 

10.20 - शिखर धवन सनरायजर्स हैदराबादकडे... 'राइट टू मॅच'चा वापर करत 5.20 कोटींना खरेदी... 



 

10.10 - आयपीएलमधील आठ संघांचं बजेटः
चेन्नईः 47 कोटी
दिल्ली डेअरडेविल्सः 47 कोटी
किंग्ज इलेव्हन पंजाबः 67.5 कोटी 
कोलकाता नाइट रायडर्सः 59 कोटी
मुंबई इंडियन्सः 47 कोटी
राजस्थान रॉयल्सः 67.5 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरः 49 कोटी
सनरायजर्स हैदराबादः 59 कोटी 

10.02 - 360 भारतीय क्रिकेटपटू आणि 218 परदेशी खेळाडूंवर लागणार बोली... 

10.00 - आयपीएलच्या 11व्या पर्वासाठी आज आणि उद्या बेंगळुरूत खेळाडूंचा लिलाव

Web Title: IPL Auction 2018 LIVE Catch all the action through the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.