बेंगळुरूः अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानवर लागलेल्या ९ कोटींच्या बोलीनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिल्यानंतर, आज आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी आणखी एका फिरकीपटूनं चमत्कार केला. कर्नाटकच्या कृष्णप्पा गौतम या ऑफ स्पिनरला खरेदी करण्यासाठी राजस्थान रॉयल्सनं बेस प्राइसपेक्षा तब्बल ६ कोटी रुपये जास्त मोजले.
२०१७च्या आयपीएल स्पर्धेत कृष्णप्पा गौतम मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. त्यावेळी मुंबईनं त्याच्यावर २ कोटींची बोली लावली होती. परंतु, यावर्षी त्याला आणखी मोठ्ठी लॉटरी लागलीय. कृष्णप्पाचा लिलाव सुरू झाला, तो २० लाखांच्या बेस प्राइसपासून. त्यानंतर, ही रक्कम वाढत वाढत ६ कोटी २० लाखांवर पोहोचली. शेवटची बोली राजस्थानची असल्यानं कृष्णप्पानं 'रॉयल' संघात थाटात प्रवेश केला.
२०१६-१७च्या रणजी मोसमात गौतमनं दिल्ली आणि आसामविरुद्ध पाच-पाच विकेट्स घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलंवहिलं शतक झळकावून आपलं फलंदाजीतील कौशल्यही सिद्ध केलं होतं. त्याच याच कामगिरीची दखल घेऊन राजस्थाननं एवढी किंमत मोजून त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं आहे.
अन्य अनकॅप्ड स्पिनर्सवर लागलेली बोलीः
राहुल चाहर - मुंबई इंडियन्स - १ कोटी ९० लाख
शहबाज नदीम - दिल्ली डेअरडेविल्स - ३ कोटी २० लाख
मुरुगन अश्विन - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - २ कोटी २० लाख
Web Title: IPL Auction 2018: Miracle of Krishnappa; Auctioned sixteen 'sixes'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.