IPL Auction 2018: धोनीच्या संघानं मोहितवर लावलेली बोली पाहून व्हाल चकित

IPL Auction 2018: मोहित शर्माची बेस प्राइस ५० लाख रुपये होती. त्याला खरेदी करण्यासाठी चेन्नई पहिल्यापासूनच आग्रही होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 05:49 PM2018-12-18T17:49:07+5:302018-12-18T17:51:03+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2018: mohit sharma sold to chennai super kings for 5 crore rupees | IPL Auction 2018: धोनीच्या संघानं मोहितवर लावलेली बोली पाहून व्हाल चकित

IPL Auction 2018: धोनीच्या संघानं मोहितवर लावलेली बोली पाहून व्हाल चकित

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबईः इतरांपेक्षा वेगळाच काहीतरी विचार करून हटके निर्णय घेणारा कर्णधार ही महेंद्रसिंग धोनीची ओळख. शांत डोक्याने आखलेल्या रणनीतीने त्यानं आपल्या संघाला अनेक मोठे विजय मिळवून दिलेत. मग, ती टीम इंडिया असो किंवा चेन्नई सुपरकिंग्ज. त्याच्या याच 'वेगळ्या' स्वभावाची प्रचिती आज आयपीएल लिलावाच्या वेळी आली. बऱ्याच काळापासून अजिबात चर्चेत नसलेल्या मोहित शर्मा या गोलंदाजाला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जनं तब्बल ५ कोटी रुपये मोजले तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. परंतु, या खरेदीमागे 'कॅप्टन कूल' धोनीचं नक्कीच काहीतरी वेगळं गणित असेल, याबद्दल चाहत्यांना खात्री आहे.

मोहित शर्माची बेस प्राइस ५० लाख रुपये होती. त्याला खरेदी करण्यासाठी चेन्नई पहिल्यापासूनच आग्रही होती. त्यांच्यासह किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांनाही मोहितनं मोहित केलं होतं. बघता-बघता मोहितवर १.७ कोटीची बोली लागली. त्यानंतर पंजाब आणि दिल्लीनं माघार घेतली. पण, मुंबई इंडियन्स पुढे सरसावली. चेन्नई आणि मुंबई संघाचे मालक कोटीच्या कोटी उड्डाणं घेत गेले. अखेर, चेन्नईनं ५ कोटींची बोली लावल्यावर मुंबईनं माघार घेतली आणि मोहित धोनी ब्रिगेडमध्ये गेला. मोहित याआधीही चेन्नई संघातून खेळला आहे. त्यानंतर, तो किंग्स इलेव्हन पंजाबमध्येही होता.     


कोण कुणाच्या ताफ्यात?

दिल्ली कॅपिटल्स: हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: शिमरॉन हेटमायर, गुरकिरत सिंग मान, शिवम दुबे
कोलकाता नाइट रायडर्स: कार्लोस ब्रॅथवेट
किंग्स इलेव्हन पंजाब: मॉइसेस हेन्रिकेस, निकोलस पूरन, मोहम्मद शामी
सनरायजर्स हैदराबाद :जॉनी बेअरस्टो, वृद्धिमान साहा
मुंबई इंडियन्स : लसिथ मलिंगा
राजस्थान रॉयल्स: जयदेव उनाडकट, वरुण अॅरॉन
चेन्नई सुपरकिंग्सः मोहित शर्मा

Web Title: IPL Auction 2018: mohit sharma sold to chennai super kings for 5 crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.