मुंबई, आयपीएल लिलाव 2019 : मुंबईच्या रणजी संघाचा यष्टीरक्षक शिवम दुबे हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण आयपीएलच्या लिलावात तब्बल पाच कोटी रुपयांची सर्वाधिक बोली त्याच्यावर लावली गेली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुच्या संघाने त्याने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे. आयपीएलपूर्वी त्याने एका षटकात तब्बल पाच षटकार लगावले होते. त्यामुळेच त्याला आयपीएलच्या लिलावात एवढा भाव मिळाल्याचे म्हटले जात आहे.
मुंबईचा बडोदा संघाविरुद्धचा रणजी सामना शिवमसाठी टर्निंग पॉइंट ठरला आहे. कारण या सामन्यात त्याने एका षटकात तब्बल पाच षटकार लगावले होते. त्यामुळेच बंगळुरुच्या संघाने तब्बल पाच कोटी रुपये मोजत त्याला आपल्या आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे.
विराट कोहलीला धक्का; 'हा' खास खेळाडू पंजाबच्या संघात दाखल
गेल्या वर्षी बंगळुरुच्या संघाने कर्णधार कोहली, ए बी डी' व्हिलियर्स आणि सर्फराझ खान यांना कायम ठेवले होते. सर्फराझसाठी बंगळुरुने गेलला देखील संघाबाहेर काढले होते. त्यावेळी तब्बल 1.75 कोटी रुपये त्याच्यासाठी बंगळुरुने मोजले होते. पण यावेळी पंजाबने त्याला संघात दाखल करून घेताना फक्त 25 लाख रुपयांवर त्याची बोळवण केली आहे.