ठळक मुद्देआयपीएल लिलावात सहभागी झालेल्या एकाही संघानं गेलला खरेदी करण्यासाठी इच्छा व्यक्त केली नाही. दहाव्या आयपीएलमध्ये आरसीबीने गेलला दहा सामन्यात अंतिम 11 मध्ये संधी दिली होती.
बंगळुरू - टी-20 क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करणाऱ्या ख्रिस गेलला आयपीएलच्या 11 व्या मोसमासाठी सुरू असलेल्या लिलावात एकाही संघाने खरेदी केलं नाही.
आयपीएल लिलावात सहभागी झालेल्या एकाही संघानं गेलला खरेदी करण्यासाठी इच्छा व्यक्त केली नाही. आयपीएलच्या दहाव्या सत्रात गेलला आपली कमाल दाखवता आली नव्हती. त्यानं केवळ एकाच सामन्यांमध्ये जोरदार फटकेबाजी केली होती. खराब परफॉर्मन्समुळे त्याला काही मॅचमध्ये प्लेइंग इलेव्हनच्या बाहेरही बसावं लागलं होतं. याचाच परिणाम आज झालेल्या लिलावात पाहायला मिळाला.
दहाव्या आयपीएलमध्ये आरसीबीने गेलला दहा सामन्यात अंतिम 11 मध्ये संधी दिली होती. मात्र, गेलने दहा सामन्यात फक्त 200 धावा काढल्या होत्या, तो पूर्णपणे अपयशी ठरला, आयपीएलमध्ये गेलने 101 सामन्यात 3626 धावा कुटल्या आहेत. आज गेलबरोबरच इंग्लडचा कर्णधार रूटवरही कोणीही बोली लावली नाही. त्यामुळे हे दोघे उद्या पुन्हा लिलावात उपलब्ध राहणार आहेत.
Web Title: IPL Auction 2018: Shockingly, the 'Emperor' of the Twenty20 'Chris Gayle' is not a buyer.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.