मुंबई, आयपीएल लिलाव 2019 : एखाद्या खेळाडूचे नाव आपल्याला माहितही नसते, पण एखाद्या घटनेमुळे तो प्रकाशझोतात येतो. वरुण चक्रवर्ती. या खेळाडूला तब्बल 8.40 कोटी रुपये आयपीएलमध्ये मिळाले आहेत. वरुणला किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने आपल्या ताफ्यात दाखल केले आहे. पण हा वरुण चक्रवर्ती, नेमका कोण हे तुम्हाला माहिती आहे का...
वरुण हा तामिळनाडूकडून रणजी क्रिकेट खेळतो. शाळेमध्ये असताना त्याचा फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे वरुणने नववीमध्ये क्रिकेट खेळायचे सोडूनही दिले होते. त्यानंतर तो पाच वर्षे क्रिकेटपासून लांब होता. या पाच वर्षांमध्ये त्याने आर्किटेक्चरचा कोर्स पूर्ण केला. सहा वर्षांनी त्याने धूळ खात पडलेल्या आपल्या क्रिकेट किटला हात लावला आणि पुन्हा एकदा तो मैदानात उतरला.
तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये वरुण नावारुपाला आला. त्याने या लीगमध्ये नऊ बळी मिळवले. त्यानंतर विजय हझारे करंडकामध्येही त्याने चमकदार कामगिरी केली. वेस्ट इंडिजच्या सुनील नरिनचा खेळ त्याने जवळून पाहिला आणि त्याच्या खेळात अमुलाग्र बदल झाला. आता बंगळुरुच्या संघात पुढच्या वर्षी तो कशी कामगिरी करतो, यावर साऱ्यांचे लक्ष असेल.