मुंबई, आयपीएल लिलाव 2019 : इंग्लंडमध्ये पुढील वर्षी होणारी वन डे विश्वचषक स्पर्धेत लक्षात घेता आयपीएलच्या 2019 च्या हंगामात अनेक परदेशी स्टार खेळाडू निम्म्यावर डाव सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट खेळाडूंनी तर माघारही घेतली आहे. मात्र, तरीही भारतीय चाहत्यांचे लक्ष आज होणाऱ्या लिलावाकडे लागले आहे. आठ संघात मिळून 70 जागांसाठी जवळपास 346 खेळाडूंवर आज बोली लावली जाणार आहे.
आजच्या लिलावात उपलब्ध असलेले काही प्रमुख खेळाडू 2 कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू : डी' ॲर्सी शॉर्ट ( ऑस्ट्रेलिया) , शॉन मार्श ( ऑस्ट्रेलिया), क्रिस वोक्स ( इंग्लंड), सॅम कुरन ( इंग्लंड), कोरे अँडरसन ( न्यूझीलंड), ब्रेंडन मॅकलम (न्यूझीलंड), कॉलीन इंग्राम ( न्यूझीलंड), लसिथ मलिंगा ( श्रीलंका), अँजेलो मॅथ्यूज ( श्रीलंका) 1.5 कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू : ॲलेक्स करी ( ऑस्ट्रेलिया), जेम्स फॉल्कनर (ऑस्ट्रेलिया), ॲलेक्स हेल्स (इंग्लंड), जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), लायम डॉसन (इंग्लंड), ल्युक राईट (इंग्लंड), जयदेव उनाडकट (भारत), मार्टिन गुप्तील (न्यूझीलंड), मॉर्ने मॉर्केल ( द. आफ्रिका), डेल स्टेन ( द. आफ्रिका), रिली रोसोव ( द. आफ्रिका).1 कोटी मूळ किंमत असलेले महत्त्वाचे खेळाडू : मोजेस हेन्रीक (ऑस्ट्रेलिया), उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया), ख्रिस जॉर्डन (इंग्लंड), ॲडम झम्पा ( ऑस्ट्रेलिया), अक्षर पटेल (भारत), मोहम्मद शमी (भारत), युवराज सिंग (भारत), वृद्धिमान सहा (भारत), हाशिम अमला (द. आफ्रिका).
ऑस्ट्रेलियाचे तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि ॲरोन फिंच यांनी आयपीएल 2019 मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षात ऑस्ट्रेलियाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्यांनी लिलाव प्रक्रियेतून माघार घेतली आहे.