Join us  

IPL Auction 2019 : 1..2..3..Sold; आयपीएलच्या लिलावात ११ वर्षांनंतर 'ह्यूज' बदल

अवघ्या काही तासांत इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019 मध्ये होणाऱ्या हंगामाच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 2:04 PM

Open in App
ठळक मुद्देआयपीएल 2019 साठीची लिलाव प्रक्रिया आज70 जागांसाठी 346 हून अधिक खेळाडूंवर बोली

जयपूर, आयपीएल लिलाव 2019 : अवघ्या काही तासांत इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019 मध्ये होणाऱ्या हंगामाच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आठ संघात मिळून 70 जागांसाठी जवळपास 346 खेळाडूंवर आज बोली लावली जाणार आहे. आयपीएलच्या लिलावात बऱ्याच दिग्गज खेळाडूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, खेळाडूंव्यतिरिक्त लिलावात एका व्यक्तीची उणीव प्रकर्षाने जाणवणारी आहे.

खेळाडूंच्या नावाची घोषणा करणारा आणि त्याच्या बोलीसाठी उत्साहाने ओरडणारा रिचर्ड मॅडली हा लिलावाचा भाग नसणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) ही घोषणा केली आहे. आयपीएल लिलावाचा आवाज म्हणून रिचर्ड यांची ओळख आहे, परंतु यंदा त्यांच्या जागी ब्रिटनचे ह्यूज एडमीडेस आज लिलाव प्रक्रिया पार पाडणार आहे. एडमीडेस हे आर्ट, क्लासिक कार आणि चॅरिटीसाठी लिलाव करतात. एडमीडेस यांच्याकडे 30 वर्षांचा अनुभव आहे. आयपीएलच्या ट्विटर हँडलवर हे जाहीर केले. 

 यंदाचा आयपीएल लिलाव बंगळुरू एवजी जयपूर येथे होणार आहे. बीसीसीआयने लिलावाच्या वेळेतही बदल केला आहे. ही लिलाव प्रक्रिया दुपारी 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत होणार आहे. रिचर्ड यांनी मात्र बीसीसीआयच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले,'' मला वाईट वाटले. हा माझा निर्णय नाही. हा बीसीसीआय आणि आयएमजी यांचा निर्णय आहे. लिलावात बदल होणार असल्याची कल्पना मला देण्यात आली होती, परंतु मलाच बदलतील हे माहित नव्हते.'' 

 

टॅग्स :इंडियन प्रीमिअर लीगआयपीएल लिलाव 2019