युवराज मुंबई इंडियन्समध्ये आल्यानं 'गुरू' सचिन तेंडुलकर खुश, चाहत्यांना आठवली वानखेडेवरची गळाभेट

मुंबई इंडियन्सने 1 कोटी मूळ किंमतीत युवराजला आपल्या संघात घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 03:29 PM2018-12-19T15:29:03+5:302018-12-19T15:33:55+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2019: Icon Sachin Tendulkar glad to have Yuvraj Singh and Lasith Malinga in Mumbai Indians camp | युवराज मुंबई इंडियन्समध्ये आल्यानं 'गुरू' सचिन तेंडुलकर खुश, चाहत्यांना आठवली वानखेडेवरची गळाभेट

युवराज मुंबई इंडियन्समध्ये आल्यानं 'गुरू' सचिन तेंडुलकर खुश, चाहत्यांना आठवली वानखेडेवरची गळाभेट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देयुवराज सिंग मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातचाहत्यांना आठवली सचिन तेंडुलकरसोबतची गळाभेटसचिन तेंडुलकरनेही केले ट्विट

मुंबई, आयपीएल लिलाव 2019 : भारताचा स्फोटक फलंदाज युवराज सिंगलामुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात दाखल करून घेताच सर्वात जास्त आनंद मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला झाला. मुंबई इंडियन्स संघाचा आयकॉन असलेल्या तेंडुलकरने 2019च्या हंगामात युवराजची फटकेबाजी पाहण्यास उत्सुक असल्याचेही सांगितले. मुंबई इंडियन्सने 1 कोटी मूळ किंमतीत युवराजला आपल्या संघात घेतले. युवराज 2019साली मुंबईकडून खेळणार असल्याने चाहत्यांना वानखेडे स्टेडियमवर झालेल्या 2011च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीचा क्षण आठवला. विश्वचषक विजयानंतर युवीने 'गुरू' तेंडुलकरला मारलेली भावनिक मिठी डोळ्यासमोर उभी राहिली. 



300 पेक्षा अधिक खेळाडूंचा या लिलाव प्रक्रियेत सहभाग होता आणि त्यापैकी केवळ 70 खेळाडू नशीबवान ठरले. पण, युवराजचे मुंबई इंडियन्स संघात जाणे सर्वांना सुखद करणारे ठरले. पहिल्या फेरीत अनसोल्ड ठरलेला युवराज पुढील मोसमात मुंबईच्या जर्सीत आयपीएलमध्ये षटकारांची आतषबाजी करण्यासाठी उत्सुक आहे. या लिलावात एक कोटी मूळ किंमत असलेल्या खेळाडूंमध्ये युवराजचा समावेश होता, परंतु पहिल्या फेरीत आठपैकी एकाही संघाने त्याच्यासाठी उत्सुकता दाखवली नाही. त्यामुळे युवराजची आयपीएल कारकीर्द धोक्यात येते का असे वाटू लागले, परंतु अंतिम टप्प्यात मुंबई इंडियन्स या एकमेव संघाने त्याच्यासाठी बोली लावली आणि एक कोटीच्या मूळ किमतीत त्याला संघात दाखल करून घेतले. 

तेंडुलकरनेही युवराज व लसिथ मलिंगाचे स्वागत केले. तो म्हणाला,'' युवराज व मलिंगाचे संघात आगमन झाल्याचा आनंद आहे. संघात युवा व अनुभवी खेळाडूंची योग्य सांगड घालण्यात आली आहे'' 
"A perfect mix of experience and youth picked up at the #IPLAuction by @mipaltan! Glad to have Lasith Malinga and @yuvstrong12 in the MI team along with the likes of @sranbarinder, Anmolpreet Singh, Pankaj Jaswal & Rasikh Dar," Tendulkar welcomed Yuvraj and Malinga along with the young new recruits.



युवराजनेही ट्विटरवर पोस्ट टाकून मुंबई इंडियन्सचे आभार मानले.


असा आहे मुंबई इंडियन्सचा संघः रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, कृणाल पांड्या, इशान किशन, सुर्यकुमार यादव, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकुल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तरे, किरॉन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्लेनघन, अॅडम मिलने, जेसन बेह्रेंडोर्फ, एव्हिन लुईस, क्विंटन डी कॉक, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंग, बरींदर सरन, पंकज जैस्वाल, रसीख दार, युवराज सिंग. 

Web Title: IPL Auction 2019: Icon Sachin Tendulkar glad to have Yuvraj Singh and Lasith Malinga in Mumbai Indians camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.