मुंबई, आयपीएल लिलाव 2019 : भारताचा सिंक्सर किंग युवराज सिंगला अखेर आयपीएलच्या लिलावात वाली मिळाल्याचे समोर आले आहे. पहिल्या फेरीमध्ये युवराजला आपल्या संघात घेण्यासाठी कुणीही उत्सुक नव्हते. युवराजची मूळ किंमत एक कोटी ठेवण्यात आली होती. पण त्याला कोणीही 'भाव' दिला नव्हता.
लिलावाच्या दुसऱ्या फेरीत मुंबई इंडियन्सने युवराजला आपल्या संघात सामील करून घेतलं आहे. पण यावेळी युवराजला जास्त किंमत मिळालेली नाही. मूळ किंमतीवरच युवराजची मुंबई इंडियन्सने बोळवण केली आहे.
युवराज काही वर्षे किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये होता. पण सध्याच्या घडीला युवराज भारताच्या कोणत्याही संघात नाही. त्याचबरोबर आगामी विश्वचषकात युवराजला संधी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर गेल्या दोन वर्षांपासून युवराज एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे युवराज आता आता आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गौतम गंभीरनंतर निवृत्त होणार असल्याचेही काही जणांनी म्हटले होते.
[18:05, 12/18/2018] Amey Gogte:
Web Title: IPL Auction 2019: Mumbai Indian's Took King Yuvraj Singh In Team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.