मुंबई, आयपीएल लिलाव 2019 : आयपीएलच्या लिलावाची पहिली फेरी पार पडली आहे. या लिलावात आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित खेळाडूंना 'भाव' न मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या 'भाव' न मिळालेल्या खेळाडूंध्ये भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगला कुणीली वाली नसल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे युवराज यापुढे आयपीएल खेळणार की नाही, याबद्दल प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
कारण युवराज काही वर्षे किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये होता. पण सध्याच्या घडीला युवराज भारताच्या कोणत्याही संघात नाही. त्याचबरोबर आगामी विश्वचषकात युवराजला संधी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर गेल्या दोन वर्षांपासून युवराज एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे युवराज आता आता आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गौतम गंभीरनंतर निवृत्त होणार असल्याचेही काही जणांनी म्हटले होते. या साऱ्या गोष्टी पाहता युवराजला पहिल्या फेरीत कुणीही वाली नसल्याचे समोर आले आहे.
त्याचबरोबर भारताचा भरवश्याचा फलंदाज चेतेश्वर पुजाराचा या यादीमध्ये समावेश आहे. ट्वेन्टी-20 क्रिकेट गाजवणारे ब्रेंडन मॅक्युल्म, मार्टिन गप्तील आणि अॅलेक्स हेल्स यांनाही कुणी भाव दिलेला नसल्याचे पाहायला मिळाले आहे.
'या' खेळाडूंना मिळाला नाही 'भाव'युवराज सिंगचेतेश्वर पुजाराब्रेंडन मॅक्युल्ममार्टिन गप्तीलख्रिस वोक्समनोज तिवारीअॅलेक्स हेल्स