IPL Auction 2019 : क्रिकेटच्या बाजारात अजूनही 'युवराज'ला किंमत आहे! 

IPL auction 2019: आयपीएल लिलाव युवराज सिंगसाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाचा होता.

By स्वदेश घाणेकर | Published: December 19, 2018 10:33 AM2018-12-19T10:33:48+5:302018-12-19T10:37:14+5:30

whatsapp join usJoin us
IPL auction 2019: Yuvraj singh still have value in cricket market! | IPL Auction 2019 : क्रिकेटच्या बाजारात अजूनही 'युवराज'ला किंमत आहे! 

IPL Auction 2019 : क्रिकेटच्या बाजारात अजूनही 'युवराज'ला किंमत आहे! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देयुवराज सिंग आयपीएलमध्ये दिसणार मुंबई इंडियन्सच्या जर्सीतमुंबई इंडियन्सने एक कोटीत त्याला आपल्या ताफ्यात घेतलेएक लढवय्या खेळाडू म्हणून युवराजची ओळख

मुंबई : आयपीएल लिलाव युवराज सिंगसाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाचा होता. क्रिकेट कारकीर्द कायम राखण्याच्या दृष्टीने हा लिलाव प्रक्रियेचे महत्त्व अधिक होते. त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये युवराज अनसोल्ड राहिल्यानंतर चाहत्यांमध्ये धाकधुक वाढलेली.. सिक्सर मॅन युवराजचा जलवा यापुढे आयपीएलमध्ये पाहायला मिळणार नाही, या भितीने मन चलबिचल झालेले. पण लिलाव प्रक्रिया शेवटाकडे आली असताना मुंबई इंडियन्सने युवराजला घेतले आणि चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. Hitman रोहित शर्मा आणि Sixerman युवराज यांची जोडी 2019 च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून धावांचा पाऊस पाडताना दिसतील. किंमतीच्या बाबतित म्हणायचे तर युवराजचा भाव बराच घसरला आहे.



कालच्या लिलावात युवराजच लक्षवेधी खेळाडू होता. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला खऱ्या अर्थाने टर्निंग पॉईंट या लिलावानंतर मिळणार होते. मुंबई इंडियन्स हा त्याचा टर्निंग पॉईंट ठरला. वरूण चक्रवर्ती सारख्या एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या खेळाडूला एकीकडे 8 कोटीहून अधिक रक्कम मिळते आणि युवराज सारख्या कर्तुत्वान खेळाडूला भाव मिळत नाही. यामुळे राग अनवार होत होता. मात्र आयपीएल हा युवकांचा खेळ आहे आणि इथे खणखणीत नाणंच जोरात वाजते. 



युवराजचा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावला आहे. स्थानिक क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी ठिकठाक होत आहे. काही मोठ्या खेळी वगळता युवराजला सातत्यराखता आलेले नाही, हेही तितकेच खरे. पण त्याच्या नावाचा ब्रॅंड खपणार याची गॅरेंटी.... पण त्याला पहिल्या राऊंडमध्ये कोणीच घेतले नाही याची अधिक चीड आहे. इंग्लंडला त्यांच्याच धर्तीवर वन डे मालिकेत हरवण्यात मोलाची भूमिका बजावणारा, कॅंसरशी संघर्ष करत असताना 2011 च्या वर्ल्ड कप विजयाचा खरा हिरो... मात्र, युवराज पहिल्या पसंतीचा खेळाडू राहिला नाही. 



कॅंसरशी यशस्वी झगडून मैदानावर परतलेल्या युवराज प्रती आदर प्रचंड वाढलेला. त्याच्या लढ्याने अनेकांना प्रेरणा दिली आणि या प्रसंगानंतर त्यानेही 'YouWeCan'ची स्थापना करून गरजूंना आधार दिला. एक खेळाडू म्हणून तो ग्रेट होताच... आहे आणि कायम राहिल, पण माणूस म्हणूनही तो सच्चा आहे. त्यामुळेच त्याचे आयपीएलमध्ये नसणे हा भावनिक मुद्दा झाला होता. स्वप्ननगरीतील मुंबई इंडियन्सने त्या भावना ओळखल्या आणि युवीला आपल्या ताफ्यात घेतले. अन्य संघांसाठी युवराजची व्हॅल्यू घसरली असली तरी क्रिकेटच्या या बाजारात 2019 मध्ये युवराजचे नाणं खणखणीत वाजेल अशी अपेक्षा आहे.

किंमत घसरली
युवराज सिंगला 2014 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 14 कोटी रुपतांय खरेदी केले होते. तो तेव्हाचा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता. त्यानंतर 2015 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने दोन कोटी जास्त म्हणजेच 16 कोटींत युवराजला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आणि आता 2018 मध्ये त्याच युवराजला एक कोटींच्या मूळ किंमतीत मुंबई इंडियन्सकडून खेळावे लागणार आहे. 

Web Title: IPL auction 2019: Yuvraj singh still have value in cricket market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.