इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 73 जागांसाठी 332 खेळाडू रिंगणार आहेत. या यादित 186 भारतीय, 143 परदेशी आणि 3 संलग्न देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. 24 नव्या खेळाडूंचा समावेश असून यात वेस्ट इंडिजडा केस्रीक विलियम्स, बांगलादेशचा कर्णधार मुश्फीकर रहीम आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पा यांचा समावेश आहे. याशिवाय सरे संघाचा 21 वर्षीय फलंदाज विल जॅक्स याची एन्ट्री लक्षवेधी ठरत आहे. जॅक्सनं संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या टी 10 सामन्यात लँकरशायरविरुद्ध 25 चेंडूंत शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधले होते.
लिलावाच्या काही तासांपूर्वी किंग्स इलेव्हन पंजाबनं मोठी घोषणा केली. त्यांनी रणजी करंडक स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज वासिम जाफर याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आयपीएल 2020 साठी जाफर हा किंग्स इलेव्हन पंजाबचा फलंदाज प्रशिक्षक असणार आहे, अशी माहिती एका वेबसाईटनं दिली आहे. रणजी करंडक स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात जाफरनं एका विक्रमाला गवसणी घातली होती. आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात विदर्भचे प्रतिनिधित्व करताना जाफरनं रणजी करंडक स्पर्धेतील 150वा सामन्याची नोंद केली. रणजी स्पर्धेच्या इतिहासात एकाही फलंदाजाला हा पल्ला गाठता आलेला नाही. 41 वर्षीय जाफरला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 20000 धावा पूर्ण करण्यासाठी केवळ 853 धावांची आवश्यकता आहे.
किंग्स इलेव्हन पंजाबनं नवीन जबाबदारी दिल्यानंतर जाफरनं संघाचे आणि प्रशिक्षक अनील कुंबळे यांचे आभार मानले. तो म्हणाला,''कुंबळे यांचे आभार. त्यांनी माझी निवड केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियात मला खेळण्याची संधी मिळाली, हा मी मानच समजतो. त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळालं. त्यामुळेच मी सध्या बांगलादेश क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद भूषवत आहे. या अनुभवाचा मी पंजाब संघालाही फायदा मिळवून देईन.''
जाफरनं आयपीएलच्या पहिल्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानं 19.16च्या सरासरीनं 115 धावा केल्या होत्या.
IPL Auction 2020 : युवा नव्हे, तर वयस्कर खेळाडूही खाणार भाव!
IPL Auction 2020: परदेशी खेळाडू भाव खाणार, जाणून घ्या कोणाची किती मूळ किंमत...
विराट कोहलीची चिंता मिटली; IPL 2020साठी सलामीला मिळाला सक्षम पर्याय
IPL 2020 Players List : आयपीएलमधल्या कोणत्या खेळाडूंना संघात ठेवले कायम, जाणून घ्या...
IPL 2020 : सर्व आठ संघांची 'बजेट' सावरताना होणार तारांबळ; जाणून घ्या कोणाकडे किती संख्याबळ!
IPL 2020: पुढील मोसमासाठी संघांनी केले अनेक दिग्गजांना रिलीज; पाहूया संपूर्ण यादी!
IPL 2020 : आयपीएलच्या पुढील मोसमात संघ संख्या वाढणार; पाहा कोणाची लॉटरी लागणार