Join us  

IPL Auction 2020: भारतीय, परदेशी खेळाडूही मिळणार 'Loan' वर; IPLच्या पुढील मोसमात होणार अदलाबदली 

338 खेळाडू लिलाव प्रक्रियेत सहभागी झाले असले तरी त्यापैकी 73 खेळाडूच घेतले जाणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 1:51 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) पुढील मोसमान नो बॉलची जबाबदारी टीव्ही अंपायरकडे सोपवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) घेतला होता. त्याच्या या निर्णयानंतर आयपीएल 2020 मध्ये अजून बरेच बदल पाहायला मिळणार आहेत. आज कोलकाता येथे आयपीएल 2020 साठीच्या खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 338 खेळाडू लिलाव प्रक्रियेत सहभागी झाले असले तरी त्यापैकी 73 खेळाडूच घेतले जाणार आहेत. पण, त्यातही एक ट्विस्ट येणार आहे. आयपीएलच्या पुढील मोसमात मध्यंतरानंतर संघ आपापसात खेळाडूंची अदलाबदल करू शकतात. त्यामुळे पुढील मोसमात खेळाडूही 'Loan' वर घेता येणार आहे.

 रन मशीन वासिम जाफरवर मोठी जबाबदारी; किंग्स इलेव्हन पंजाबची घोषणा

आयपीएलमध्ये हे प्रथम होतोय असं नाही. मागील मोसमातही खेळाडूंसाठीच्या अदलाबदलीसाठी ट्रेड विंडो खुली करण्यात आली होती, परंतु तेव्हा केवळ अनकॅप ( स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेले) खेळाडूंसाठीच हा नियम होता. पण, 2020मध्ये कॅप ( आंतरराष्ट्रीय ) खेळाडूंची ( भारतीय किंवा परदेशी)  लोन द्वारे अदलाबदल होणार आहे. आयपीएलच्या मागील मोसमाच्या मध्यंतरानंतर पाच दिवसांसाठी विंडो खुली करण्यात आली होती आणि त्यात अनकॅप खेळाडूंची अदलाबदल होणार होती. पहिल्या सत्रात दोनपेक्षा अधिक सामने न खेळलेल्या खेळाडूंना लोनवर देता येत होते. पण, एकाही संघानं तसं केलं नाही. आताही तोच नियम कॅप खेळाडूंसाठी लागू आहे. 

या लोन फीसाठी संघमालकांना शिल्लक रकमेतून किंमत मोजावी लागणार आहे. त्यात खेळाडूंसोबत कोणतीही आर्थिक डील होणार नाही. केवळ आयपीएलच्या व्यवस्थापनाला त्याची कल्पना द्यावी लागणार आहे. पुढील मोसमाच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीत, परंतु आयपीएल व्यवस्थापन संघ मालकांशी चर्चा करून लवकरच याबाबत घोषणा करतील. 

आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत बुधवारी आणखी सहा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे ही संख्या 338 अशी झाली आहे. नव्या खेळाडूंमध्ये विनय कुमार, अशोक दिंडा, रॉबीन बिस्त, संजय यादव, मॅथ्यू वेड आणि जॅक वेथराल्ड यांचा समावेश आहे.   

IPL Auction 2020 : युवा नव्हे, तर वयस्कर खेळाडूही खाणार भाव!

IPL Auction 2020: परदेशी खेळाडू भाव खाणार, जाणून घ्या कोणाची किती मूळ किंमत...

विराट कोहलीची चिंता मिटली; IPL 2020साठी सलामीला मिळाला सक्षम पर्याय

IPL 2020 Players List : आयपीएलमधल्या कोणत्या खेळाडूंना संघात ठेवले कायम, जाणून घ्या...

IPL 2020 : सर्व आठ संघांची 'बजेट' सावरताना होणार तारांबळ; जाणून घ्या कोणाकडे किती संख्याबळ!  

IPL 2020: पुढील मोसमासाठी संघांनी केले अनेक दिग्गजांना रिलीज; पाहूया संपूर्ण यादी! 

IPL 2020 : आयपीएलच्या पुढील मोसमात संघ संख्या वाढणार; पाहा कोणाची लॉटरी लागणार

 

टॅग्स :आयपीएल 2020आयपीएल लिलाव 2020बीसीसीआय