इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे आज खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. 73 जागांसाठी 338 खेळाडू रिंगणार आहेत. या यादित 190 भारतीय, 145 परदेशी आणि 3 संलग्न देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. पहिल्याच प्रयत्नात मुंबई इंडियन्सनं ख्रिस लीनला दोन कोटी मूळ किमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचनं मोठी बोली लागली. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं त्याला आपल्या ताफ्यात घेतले. पण, ऑसींच्याच ग्लेन मॅक्सवेलसाठी किंग्स इलेव्हन पंजाबनं 10.75 कोटी मोजली. मात्र, पॅट कमिन्सनं याही पुढे जात रेकॉर्ड तोड कमाई केली. दुपारी 3.30 वाजल्यापासून सुरू झालेल्या या लिलावाच्या पहिल्या सत्रात म्हणजे साडे तीन तासांत तब्बल 1 अब्ज रक्कमेची उलाढाल झाली.
टीम इंडियाची धुलाई करणाऱ्या शिमरोन हेटमायरचं नशीब फळफळलं
तीन तासांत 1 अब्जाहून अधिक उलाढाल, 33 क्रिकेटवीर मालामाल
लिलावाच्या पहिल्या सत्रात पॅट कमिन्सला सर्वाधिक 15.50 कोटी रक्कम मिळाले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल ( 10.75 कोटी), ख्रिस मॉरिस ( 10 कोटी), शेल्डन कोट्रेल ( 8.50 कोटी) आणि नॅथन कोल्टर नील ( 8 कोटी) यांचा क्रमांक येतो. सायंकाळी सात वाजेपर्यंत 33 खेळाडूंवर बोली लागली होती, तर 17 खेळाडू अनसोल्ड राहिले होते. 33 खेळाडूंसाठी आठ संघांनी मिळून एकूण 1 अब्ज 17 कोटी 55 लाख रक्कम मोजली होती. या लिलावात वेस्ट इंडिजच्या शेल्डन कोट्रेल आणि शिमरोन हेटमायर यांनी विक्रमी भाव मिळवला. आतापर्यंत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना मिळालेली ही सर्वाधिक रक्कम ठरली. यापूर्वी ड्वेन ब्राव्होला 6.4 कोटींत चेन्नई सुपर किंग्सनं आपल्या चमूत घेतले होते. पण, आज कोट्रेलला 8.50 कोटींत किंग्स इलेव्हन पंजाबनं आणि हेटमायरला दिल्ली कॅपिटल्सनं 7.75 कोटींत आज आपल्या संघाचा सदस्य केले.
- IPL Auction 2020: पॅक कमिन्सची रेकॉर्ड तोड कमाई, KKRनं मोजली तगडी रक्कम
- IPL Auction 2020 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात स्फोटक फलंदाज; टी10 लीगमध्ये पाडलेला धावांचा पाऊस
- IPL Auction 2020: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचला मोठी बोली; RCBनं मारली बाजी
- IPL Auction 2020: टीम इंडियाचा कर्णधार अन् विराट सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात
- IPL Auction 2020: पहिल्या फेरीत कोणाला सर्वाधिक बोली, कोण राहिलं Unsold?
- IPL Auction 2020: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तो' परतला, लसिथ मलिंगाला मोठा दिलासा मिळाला
- IPL Auction 2020: चेन्नई सुपर किंग्स सर्वांची 'फिरकी' घेणार; टीम पाहून तुम्हालाही हे पटेल
- IPL Auction 2020: 'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; यशस्वीला २.४ कोटींची 'लॉटरी'