Join us  

IPL Auction 2021 : विराट कोहलीच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने लगेच केलं ट्विट; म्हणाला...

IPL Auction 2021 Glenn Maxwell : आता विराट, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल अशी तगडी फौज RCBकडे आहे.

By मुकेश चव्हाण | Published: February 18, 2021 5:06 PM

Open in App

IPL Auction 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) ऑक्शमनध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टैपलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. १४.२५ कोटीपर्यंत दोघांमध्ये चढाओढ रंगली पण पर्समध्ये १९ कोटीच असल्यानं CSKनं माघार घेतली. विराट कोहलीच्या ( Virat Kohli) च्या संघानं त्याला १४.२५ कोटींत खरेदी केलं. आता विराट, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल अशी तगडी फौज RCBकडे आहे. आयपीएल इतिहासातील तो तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. Glenn Maxwell becomes the third most expensive player in IPL history

ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell), मुळ किंमत २ कोटी (Base Price: INR 2 Crores) - किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेला यूएईत साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे KXIPनं त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. पण, नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमध्ये त्यानं १४३.५६च्या स्ट्राईक रेटनं ३७९ धावा चोपल्या. त्यामुळे आज त्याच्यासाठी चुरस रंगली. CSKला कोटा पूर्ण करण्यासाठी एकच परदेशी खेळाडू घ्यायचा होता. त्यामुळे ते मॅक्सवेलसाठी अडून बसले होते. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आणि स्टीफन फ्लेमिंग ( Stephen Flemming) हे फोनवरून लक्ष्मीपती बालाजीला सूचना करत होते. 

संघाच्या विजयासाठी मी माझं योगदान देण्यासाठी खूप उत्सुक आहे, असं ग्लेन मॅक्सवेल यांने म्हटलं आहे.

ग्लेन मॅक्सवेलची ऑक्शनमधील कामगिरी 

२०१३ - १ कोटी - मुंबई इंडियन्स २०१४ - ६ कोटी - पंजाब किंग्स२०१८ - ९ कोटी - दिल्ली कॅपिटल्स२०२०- १०.७५ कोटी - पंजाब किंग्स २०२१ - १४.२५ कोटी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 

आयपीएल ऑक्शनमधील महागडे खेळाडू ( Highest purchases in #IPLAuction ) 

युवराज सिंग - १६ कोटी ( दिल्ली कॅपिटल्स २०१५)  पॅट कमिन्स  १५.५ कोटी ( कोलकाता नाइट रायडर्स, २०२०) बेन स्टोक्स १४.५ कोटी ( रायझिंग पुणे सुपरजायंट्स २०१७)ग्लेन मॅक्सवेल १४.२५ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २०२१) युवराज सिंग १४ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  २०१४)  

टॅग्स :आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनग्लेन मॅक्सवेलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल