IPL Auction 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या लिलावाला सुरुवात झाली. स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith), ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) यांच्यासह अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) यांच्या नावाची चर्चा आहे. पण, लिलावाला सुरूवात होताच चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) ट्रेंडमध्ये आला. त्याला कारणही तसेच ठरले. चेन्नई सुपर किंग्सकडून ( CSK) बोली लावण्यासाठी आलेल्या टीमनं 'Definitely Not'ची जर्सी घातलेली पाहायला मिळाली.. IPL Auction 2021 Live Today
काय आहे 'Definitely Not'!यूएईत पार पडलेल्या आयपीएलच्या १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीचं ( MS Dhoni) आयपीएलमधील करियर संपुष्टात येईल अशी चर्चा सुरू झाली होती. आयपीएलपूर्वी धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळेच यूएईत झालेली आयपीएल ही त्याची शेवटची अशी चर्चा सुरू झाली. पण, ही चर्चाच राहिली. मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या फायनलपूर्वी टॉस झाल्यानंतर समालोचक मुरली कार्तिक यानं धोनीला ही तुझी पिवळी जर्सीतील अखेरची मॅच आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर धोनीनं 'Definitely Not' असं उत्तर दिलं होतं. IPL Auction 2021 Latest News
चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) -रिलीज खेळाडू : केदार जाधव, हरभजनसिंग, मुरली विजय, पीयूष चावला, मोनू कुमार, शेन वॉटसन;
रिटेन खेळाडू : एमएस धोनी, सुरेश रैना, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिशेल सैंटनर, आर. साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड़, जोश हेजलवुड, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम कुरेन;
२२.९ कोटी शिल्लक - चेन्नईला ६ भारतीय व १ परदेशी खेळाडूची जागा भरायची आहे.