IPL Auction 2021 : इंडियन प्रीमिअरच्या लिलावात ( IPL 2021) नेहमीच युवा खेळाडूंना मिळणारी किंमत पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतोच... याही वेळेस भारताच्या कृष्णप्पा गौतम ( Krishappa Gowtham) यानं सर्वांना चक्रावून सोडले आहे. चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super kings) २० लाख मुळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी तब्बल ९.२५ कोटी रुपये मोजले. महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) संघाकडे १९.९ कोटीच रक्कम शिल्लक होती आणि त्यापैकी ९.२५ कोटी कर्नाटकच्या या अष्टपैलू खेळाडूसाठी मोजल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आयपीएलच्या इतिहासात अनकॅप खेळाडूला मिळालेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. ( Krishappa Gowtham becomes the most expensive uncapped player in IPL history) IPL Auction 2021 : खूश हुआ 'कॅप्टन कोहली'; पाकिस्तानची झोप उडवणाऱ्या भिडूवर RCBची 'विराट' बोली
गौतमनं व्यावसायिक क्रिकेटची सुरुवात बंगळुरू येथे १५ वर्षांखालील झोनल स्पर्धेतून केली. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यानंतर २०१२मध्ये त्यानं कर्नाटक संघासाठी रणजी करंडक स्पर्धेतून पदार्पण केलं. बंगालविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्यानं दोन विकेट्स घेतल्या. २०१६च्या रणजी मोसमात त्यानं दिल्ली आणि आसाम संघांविरुद्ध सलग सामन्यांत डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला. १०८ धावांत ७ बाद ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. फेब्रुवारी २०१७मध्ये मुंबई इंडियन्सनं त्याच्यासाठी दोन कोटी मोजले आणि २०१८मध्ये तो राजस्थान रॉयल्सचा सदस्य होता. IPL Auction 2021 Live Today IPL Auction 2021 : शाहरुख खान पंजाबचा होताच प्रिती झिंटाच्या गालावर खुलली कळी; Video व्हायरल
२०१९मध्ये कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये त्यानं बेल्लारी टस्कर्स संघाकडून खेळताना शिवामोगा लायन्सविरुद्ध ५६ चेंडूंत १३४ धावा कुटल्या होत्या. त्यानंतर त्यानं त्याच सामन्यात १५ धावा देत ८ विकेट्सही घेतल्या. २०१९मध्येच देवधर ट्रॉफीत भारत बी संघात त्याला संधी मिळाली. २०२१च्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताच्या पाच नेट बॉलर्समध्ये त्याचा समावेश आहे. IPL Auction 2021 News in Marathi IPL Auction 2021 : चेतेश्वर पुजाराला MS Dhoni चा आधार; टाळ्यांच्या कडकडाटात झालं संघात स्वागत, Video
३२ वर्षीय गौतमनं ४२ प्रथम श्रेणी सामन्यांत १०४५ धावा केल्या आहेत आणि त्यात १ शतक व ४ अर्धशतकाचा समावेश आहे. ४५ लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यानं ५३० धावा. ६२ ट्वेंटी-२० सामन्यात त्यानं ५९४ धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १६६, लिस्ट ए क्रिकेटमध्ये ६७ आमि ट्वेंटी-20 त त्याच्या नावावर ४१ विकेट्स आहेत. IPL Auction 2021 : १ चेंडूंत १७ धावा देणाऱ्या गोलंदाजासाठी पंजाब किंग्सनं मोजले ८ कोटी!
Web Title: IPL Auction 2021: Krishappa Gowtham Sold For 9.25 Crore; becomes the most expensive uncapped player in IPL history
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.